`माथेरानच्या राणी`च्या तब्येतीसाठी कर्मकांडाचं स्तोम!

Last Updated: Saturday, April 26, 2014, 21:37

अंधश्रद्धेचे भूत अजून जायचे नाव घेत नाही... माथेरानची टॉय ट्रेन सुरळीत चालावी यासाठी यंदा नेरळ येथील रेल्वेच्या लोकोशेड मध्ये चक्क होम हवनचे आयोजन करण्यात आले होते.

सत्ता शिवसेनेची, तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेकडे

Last Updated: Saturday, April 26, 2014, 11:05

लोकसभा निवडणुकीत एकमेकासमोर उभ्या ठाकलेल्या शिवसेना-भाजप,मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या ठाणे महापालिकेतील दिग्गजांनी सत्तेसाठी पुन्हा एकदा अजब साटेलोटे केलं. ठाणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेच्या हवाली केल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वेला उत्कृष्ट मानांकन

कोकण रेल्वेला उत्कृष्ट मानांकन

Last Updated: Friday, April 25, 2014, 16:15

कोकण रेल्वेला कोर्पोरेट संचालनसाठी उत्कृष्ट मानांकन मिळाले आहे. या मानांकनामुळे कोकण रेल्वेच्या मानात तुरा खोवला गेला आहे. वर्षभरात प्रवाशी सुविधा आणि महसुलामध्ये वृद्धी केल्याने हे मानांकन देण्यात आले आहे.

ठाण्यात महिला निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू

ठाण्यात महिला निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू

Last Updated: Thursday, April 24, 2014, 20:56

ठाण्यात खोपटच्या मतदान केंद्रावर एका निवडणूक अधिकारी महिलेचा मृत्यू झालाय. वैशाली भावे असं या ३५ वर्षीय महिलेचं नावं असून त्या न्यू बॉम्बे सिटी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाण्यात सुट्टी ?

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाण्यात सुट्टी ?

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 16:24

लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सहाव्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात खासगी आस्थापनावरील संस्था, हॉटेल, मॉल यांनी आपल्या कर्माचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर करावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.

जावयासह गांधी कुटुंबावर मोदींचा हल्लाबोल

जावयासह गांधी कुटुंबावर मोदींचा हल्लाबोल

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 13:32

अवघ्या १ लाखांचे ३०० कोटी रुपये करणारा जादूगार कोण आहे?, असा सवाल करत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर तोंडसुख घेतलं. कल्याणच्या सभेत झालेल्या छोटेखानी भाषणात मोदींनी काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. अमेरिकेतल्या.... या मासिकात रॉबर्ट वडेरांबद्दल आलेल्या एका लेखाचा हवाला देऊन मोदींनी ही टीका केली.

राज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार

Last Updated: Saturday, April 19, 2014, 18:56

राज्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेडा गावात वीज कोसळून एक जण ठार तर चार जण जखमी झालेत.

मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एक जखमी

मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एक जखमी

Last Updated: Thursday, April 17, 2014, 19:54

शहरातील मोनिका हॉलमध्ये झालेल्या वकिलांच्या बैठकीत मनसे कार्यकर्त्यांत हाणामारी झाली असून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने मनसेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

पुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातही गोंधळ

पुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातही गोंधळ

Last Updated: Thursday, April 17, 2014, 14:06

पुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत. रत्नागिरीत वर्षानुवर्ष मतदान करणा-या ज्येष्ठ नागरिकांचं नाव यादीत नव्हतं. त्यामुळे पुन्हा मतदार यादीतील गोंधळ पुढे आला आहे.

हुश्श... राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा थंड!

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 09:34

राज्यातल्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण १९ मतदारसंघांमध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी मतदान होतंय.