चला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी

चला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 08:15

अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोहा नगरपालिकेनंतर ३ ग्रामपंचायतींवरही मनसेचं वर्चस्व

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 11:37

शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.

दिवाळी झोकात, चक्क रिक्षाचालकांना बोनस...तोही ४१ हजारांचा

दिवाळी झोकात, चक्क रिक्षाचालकांना बोनस...तोही ४१ हजारांचा

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 09:25

रिक्षा चालकांनाही बोनस मिळालाय. ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण हे खरं आहे. बदलापुरातील २५६ रिक्षाचालकांना तब्बल चौदा लाख ८२ हजार रूपये संघटनेच्यावतीने बोनसरुपात देण्यात आले.

नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर घरातच अॅसिड हल्ला

Last Updated: Monday, October 28, 2013, 16:09

एका अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना नालासोपाऱ्यात घडलीय. नवव्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीच्या अंगावर अज्ञात व्यक्तीनं अॅसिड फेकलं.

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी

Last Updated: Monday, October 28, 2013, 09:57

रायगड दिवेआगर इथलं सुवर्ण गणेश मंदिर नव्यानं बांधण्यासाठी अखेर मोक्का न्यायालयाची परवानगी मिळालीय. २४ मार्च २०१२ला या मंदिरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम सोन्याचा गणेश मुखवटा आणि काही अलंकार लंपास केले होते. यावेळी २ पहारेकर्‍यांनाही ठार मारण्यात आलं होतं.

आदिवासी मोखाड्यात बांधणार हॉस्पिटल, उद्धव ठाकरेंची घोषणा

Last Updated: Sunday, October 27, 2013, 09:18

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसराचा दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेतर्फे मोखाडा तालुक्यात सुरु असलेल्या कुपोषित बालक आणि गरोदर मातांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. शिवाय कुपोषित बालकं त्याच्या मातांना मिठाई,साडी चोळी वाटपही केली.

अबु सालेम टोळीतल्या गुन्हेगाराला अटक

अबु सालेम टोळीतल्या गुन्हेगाराला अटक

Last Updated: Saturday, October 26, 2013, 16:47

ठाण्यात एका ज्वेलर्सवर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या अबू सालेम टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला नौपाडा पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. राजेश हातणकर असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर खुनाचे १५ गुन्हे दाखल आहेत.

नारायण साईच्या विरारमधील आश्रमावर पोलिसांची धाड

Last Updated: Saturday, October 26, 2013, 07:50

गुजरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला नारायण साई याच्या विरारमधील आश्रमात बसल्याच्या संशयावरून पोलिसांनी आरासाम बापूंच्या विरारच्या आश्रमावर काल धाड टाकली.

अनोखा आकाश कंदील, जो चक्क बोलतो!

अनोखा आकाश कंदील, जो चक्क बोलतो!

Last Updated: Friday, October 25, 2013, 14:09

चिल्ड्रेन टेक सेंटर ठाणे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेनं विकसित केलाय एक अनोखा आकाश कंदील. जो चक्क बोलतो. विशेष म्हणजे सौर उर्जेवर चालत असल्यामुळे तो विजेचीही बचत करतो.

मध्य रेल्वेच्या वाशिंद स्टेशनवर गोळीबार

मध्य रेल्वेच्या वाशिंद स्टेशनवर गोळीबार

Last Updated: Friday, October 25, 2013, 11:18

मध्य रेल्वेच्या वाशिंद स्टेशनमध्ये आज सकाळी गोळीबार झाला. महिला डब्यात लपून बसलेल्या दोघांनी हा गोळाबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.