प्रेमविवाह केल्याने पित्याने केला मुलीचा बलात्कार-खून

Last Updated: Thursday, November 7, 2013, 07:50

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून पित्याने तिचा खून करून काटा काढलाच शिवाय मित्राच्या मदतीने बलात्कार करून मुलगी-वडील नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना भाईंदरमधील काशीमीरा परिसरात घडली. या धक्कादायक घटनेची चीड व्यक्त करण्यात येत आहे.

अरेरे...भाऊबिजेलाच बहिणीची आत्महत्या

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 16:26

नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. भाऊबिजेलाच बहिणीनीने आत्महत्या केली. भावाला ओवाळून तिने आत्महत्या केल्याने सीबीडी-बोलापूर येथील आग्रोळी गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे नेमेके कारण समजू शकलेले नाही.

सावर्डे गावाला वादळाचा तडाखा, अनेकांचे संसार उघड्यावर

सावर्डे गावाला वादळाचा तडाखा, अनेकांचे संसार उघड्यावर

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 19:01

मुंबई-गोवा महामार्गावरच्या सावर्डे गावाला ऐन दिवाळीत वादळाचा मोठा फटका बसला. सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळाने अनेक घरांवरची छपरे उडाली आणि संसार उघड्यावर प़डले. अवघी पाच मिनिटे घोंघावलेल्या या वादळात शेकडो झाडे मुळापासून उन्मळून घरांवर तसेच रस्त्यांवर पडली. त्यामुळे सावर्डे परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या वादळामुळे प्रकाशाचा हा सण या गावक-यांसाठी अंधार घेऊन आलाय.

सावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक

सावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 11:48

तेलही गेलं.. तुपही गेलं अशीच काहीशी अवस्था ठाण्यातल्या एका व्यावसायिकाची झालीय. तब्बल ७० लाखांचं त्याचं घर बनावट कागदी नोटांमध्ये विकलं गेलं.

रत्नागिरीत वादळी वाऱ्याचा तडाखा

रत्नागिरीत वादळी वाऱ्याचा तडाखा

Last Updated: Monday, November 4, 2013, 23:39

रत्नागिरी जिल्ह्यात सावर्डे परिसराला वादळी वा-यांच्या जबर तडाखा बसलाय. अनेक भागात झाडं उन्मळून पडलेत. एका गाडीवर झाड पडल्यामुळे १ जण ठार तर पाच जखमी झालेत.

कोयना एक्स्प्रेसनं चिरडलं, चौघांचा मृ्त्यू

कोयना एक्स्प्रेसनं चिरडलं, चौघांचा मृ्त्यू

Last Updated: Sunday, November 3, 2013, 14:04

आज रविवारच्या दिवशी ट्रॅक दुरुस्तीचं काम करणाऱ्या चार गँगमनना मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसनं चिरडलं. या अपघातात चारही गँगमनचा जागीच मृत्यू झालाय.

ठाण्यात दिवाळीतली संगीतमय सांस्कृतिक मेजवानी

ठाण्यात दिवाळीतली संगीतमय सांस्कृतिक मेजवानी

Last Updated: Saturday, November 2, 2013, 10:34

राज्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. दिवाळीतली ही संगीतमय सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला नागरिक उत्सुक असतात. ठाण्यातही गडकरी रंगायतनमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.

ते दिवस राहिले नाहीत....(लेख)

ते दिवस राहिले नाहीत....(लेख)

Last Updated: Saturday, November 2, 2013, 09:02

दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत.

आदिवासी : ऐकलं नाही असं काही...

आदिवासी : ऐकलं नाही असं काही...

Last Updated: Friday, November 1, 2013, 17:50

दसरा-दिवाळी हे जोडशब्द एक वेगळाच उत्साह घेऊन येतात. दसऱ्यापेक्षाही दिवाळी हा अधिक मोठा आनंदोत्सव. अपवाद बहुदा जव्हार-मोखाड्याच्या आदिवासींचाच... कारण तिथं जास्त महत्त्व असतं ते दस-याला. जव्हार ही देशातल्या पहिल्या आदिवासी संस्थानाची राजधानी. दस-याला आपल्या राजाला सोनं द्यायला यायची गेल्या शेकडो वर्षांची परंपरा हे आदिवासी बांधव आजही पाळतायत.

कोकण रेल्वेचा सतर्कता आठवडा

कोकण रेल्वेचा सतर्कता आठवडा

Last Updated: Friday, November 1, 2013, 07:34

कोकण रेल्वेकडून सतर्कता आठवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृती करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अनेक स्थानकांवर आणि कार्यालयात बॅनर आणि पोस्टर लावले गेले आहेत.