ठाण्यात अज्ञातांनी बाईक्स जाळल्या, राजकारणही तापलं!

ठाण्यात अज्ञातांनी बाईक्स जाळल्या, राजकारणही तापलं!

Last Updated: Monday, September 30, 2013, 12:00

ठाण्यात वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रघुनाथनगर परिसरात सहा बाईक्स जाळल्याची घटना घडलीय. अज्ञात इसमांनी या बाईक्स पेटवून दिल्या. तसंच परिसरातील ‘आनंदस्मृती’ व्यायामशाळाही पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

मुरबाडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, पाचही जण ठार

Last Updated: Sunday, September 29, 2013, 13:16

ठाणे ग्रामीण भागातील टोकवडे इथल्या नाणेघाट भागातील जंगलात एका हेलिकॉप्टरला अपघात झालाय. वीजेच्या तारेला धडकून या हेलिकॉप्टरला अपघात झालाय. मुंबईहून औरंगाबादकडे निघालेलं युनायटेड हॅचरीज कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं.

कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी स्पेशल 'एसी सुपरफास्ट'

कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी स्पेशल 'एसी सुपरफास्ट'

Last Updated: Saturday, September 28, 2013, 10:41

दिवाळीला गावाला जाण्यासाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद आणि मंगलोर (साप्ताहिक) दरम्यान एसी सुपर फास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

खराब रस्त्यांमुळे कोकणातला पर्यटनव्यवसाय धोक्यात

खराब रस्त्यांमुळे कोकणातला पर्यटनव्यवसाय धोक्यात

Last Updated: Friday, September 27, 2013, 19:03

चांगले रस्ते हे विकसित देशाची निशाणी मानली जाते. पर्यटनस्थळासाठीही हेच तत्व लागू आहे. पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी रस्ते चांगले असणं ही मुलभूत गरज आहे. मात्र कोकणात नेमकं याच्या उलट घडतंय.

पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग अजूनही मागास

पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग अजूनही मागास

Last Updated: Friday, September 27, 2013, 18:44

महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मोठा गाजावाजा करून मान्यता मिळविलेल्या कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पर्यटन प्रकल्प आजही अपूर्ण स्थितीत आहेत.

मुंबई गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यातील जेलमध्ये

मुंबई गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यातील जेलमध्ये

Last Updated: Friday, September 27, 2013, 09:20

मुंबईतील शक्तीमिल गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यामधील जेलमध्ये सापडला आहे. सामूहिक बलात्कारातील आरोपी बेपत्ता असल्याने त्याला न्यायालयापुढे हजर करता आले नव्हते. त्यामुळे पोलिसांवर नामुष्की ओढवली होती.

हाणामारी करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांकडून जनतेची माफी

हाणामारी करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांकडून जनतेची माफी

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 09:53

कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल झाली. महासभेच्या सभागृहातच हाणामारी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या हाणामारीच्यावेळी सभागृहात तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मल्लेश शेट्टी आणि रवींद्र पाटील यांचे राजीनामे घेतले. त्यानंतर या दोघांनी जनतेची माफी मागितली.

ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं निधन

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 10:57

ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं आज सकाळी डोंबिवलीत निधन झालं. शंना यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. लेखक, नाटककार अशी त्यांची ओळख होती.

अबब..११० कोटी खर्ची तरीही ठाण्यात कचऱ्याचं साम्राज्य

अबब..११० कोटी खर्ची तरीही ठाण्यात कचऱ्याचं साम्राज्य

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 13:28

सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे कधी होणार ? हा प्रश्न कायम आहे. महापालिका घन कचऱ्यावर ११० कोटी रुपये खर्च करते. तरीही शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. यावर ठाणेकर नाराज आहेत. तर महापालिका मात्र आम्ही शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केलाय, असा दावा करतेय.

‘त्या’ बिल्डरची राष्ट्रवादीच्या  नेत्यांशी जवळीक!

‘त्या’ बिल्डरची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक!

Last Updated: Monday, September 23, 2013, 10:40

मुंब्रा इमारत दुर्घटना प्रकरणी दोन बिल्डरांना अटक करण्यात आलीय. अकिल आणि शकील शेख अशी त्यांची नावं असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. यापैकी शकील शेख याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक असल्याचं उघड झालंय.