हापूस आंब्याच्या पहिल्या पेटी दहा हजारांची

Last Updated: Saturday, December 1, 2012, 12:42

आंबा प्रेमींसाठी खूषखबर... पोषक हवामानामुळे यंदा कोकणचा प्रसिध्द हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला लवकर येण्याची शक्यता आहे.

लवकरच येणार हापूस आंबा बाजारात

Last Updated: Friday, November 30, 2012, 18:37

पोषक हवामानामुळे यंदा कोकणचा प्रसिध्द हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला लवकर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतून पहिली आंब्याची पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. पहिल्या चार डझनच्या पेटीचा भाव दहा हजार रुपये एवढा आहे.

चिपळूण साहित्य संमेलन गुरांच्या कोंडवाड्यात?

Last Updated: Friday, November 30, 2012, 10:44

८६ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये होतंय. मात्र ज्या ठिकाणी हे संमेलन होणारे आहे त्या ठिकाणची इमारत म्हणजे खरंच सांस्कृतिक केंद्र आहे की गुरांचा कोंडवाडा? असा प्रश्न साहित्यप्रेमींना पडतोय.

फेसबुक प्रकरण : सेनेचा पालघर बंद

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 10:16

शिवसेनेनं पुकारलेल्या पालघर बंदला सुरुवात झालीये. सकाळपासून बाजारपेठेतली दुकानं उघडलेली नाहीत. शहरातली रिक्षा आणि इतर खासगी वाहतूक पूर्णपणं बंद आहे. आज सार्वजनिक सुट्टी असल्यानं शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. पोलिसांचा क़डेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

सी गल्स पाहायचेत, चला कोकणात!

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 09:22

कोकणात सध्या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. गुलाबी थंडीचा आनंद घेत हे परदेशी पाहुणे समुद्रकिनाऱ्यावर मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरलीय.

ट्राम रेल्वे करणार ठाणेकरांचा प्रवास सुकर

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 09:01

ठाण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आणि आम आदमीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ट्राम रेल्वे सुरू करण्याचा नवा प्रस्ताव पुढे आला आहे. येत्या दीड वर्षात ‘लाईट रेल्वे ट्रान्सपोर्ट’ (एलआरटी) सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिलीय.

नवी मुंबईत पुन्हा सागर नाईक महापौर

Last Updated: Monday, November 26, 2012, 13:04

नवीमुंबई महापालिकेच्या महापौरपदी पुन्हा राष्ट्रवादीच्या सागर नाईक यांची निवड झाली आहे. सागर नाईक यांनी शिवसेनेचे सतीश रामाणे यांचा पराभव केला. नाईक यांना ५८ मतं मिळाली, तर रामाणे यांना फक्त १५ मतं मिळाली.

गाडगीळ अहवालामुळे कोकणचा विकास ठप्प होईल - मुख्यमंत्री

Last Updated: Sunday, November 25, 2012, 15:57

कोकणाचा विकास होण्यासाठी आणि काय विकास केला जावा यासाठी माधव गाडगाळ समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या माधव गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारल्यास कोकणचा विकास ठप्प होईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

Last Updated: Sunday, November 25, 2012, 13:01

दिवा येथे मालगाडीचा डबा घरसल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटांने धावत होत्या. दरम्यान, ही वाहतूक सुरळीत झाली आहे.

आशियातल्या सगळ्यात मोठ्या जिल्ह्याचं विभाजन?

Last Updated: Saturday, November 24, 2012, 18:44

आशिया खंडातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन लवकरच होण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.