माथेरानची राणी आता मोठी झालीय!

Last Updated: Thursday, November 22, 2012, 18:54

माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर... नेरळ - माथेरान टॉय ट्रेनला आता विशेष डबा जोडण्यात आलाय. या विशेष डब्यात पर्यटकांसाठी खास सुविधाही देण्यात आल्यात.

विरारमध्ये सिलिंडर स्फोट, ४ ठार १७ जखमी

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 23:15

विरारमध्ये बेकायदा सिलेंडर भरताना झालेल्या स्फोटात चार जण ठार तर १७ जण जखमी झाले आहे. जखमींना विरारच्या संजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बंटी बबलीच्या घरातलं `घबाड` पाहून पोलिसही थक्क!

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 19:04

`स्टॉक गुरू` या शेअर मार्केट कंपनीच्या नावे लाखो लोकांची फसवणूक करणाऱ्या उल्हास खैरे या महाठगाच्या घरात पोलिसांना अलिबाबाची गुहाच सापडली आहे.

साहित्य संमेलन : स्वागताध्यक्ष पदावरून वाद

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 16:50

८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला लागलेलं ग्रहण सुटण्याची काही चिन्ह दिसत नाहीएत. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी तटकरेंच्या नावाचं समर्थन केलंय.

रत्नागिरी अपघातात सहा ठार, दोघे मुंबईचे

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 11:35

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजीक असुर्डे गावाजवळ नीता ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झालाय. अपघातामध्ये ६ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत.

पनवेल हत्याकांडप्रकरणी एक अटकेत

Last Updated: Monday, November 19, 2012, 12:56

पनवेलजवळच्या फार्महाऊसवरील हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलयं. हत्या करणाऱ्या चंद्रकांत वाघमारे याला पोलिसांनी अटक केली.

कोकण रेल्वे मार्गावर रात्री विशेष गाडी

Last Updated: Saturday, November 17, 2012, 22:19

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखा महाराष्ट्रासह देश शोकसागरात बुडाला आहे. कोकणातील शिवसैनिकांसाठी मुंबईत येणाऱ्यासाठी मडगाव ते मुंबई खास रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे रात्री दहावाजता मडगाववरून सुटेल.

करोडोंच्या उलाढालीत, चार जणांचा खून

Last Updated: Saturday, November 17, 2012, 15:31

पनवेल तालुक्यातील शिरवलीत झालेल्या चार जणांच्या हत्येच्या तपासाला वेग आलाय. घटनास्थळी पोलीसांना १३ सीमकार्ड आणि आठ मोबाईल सापडले असून याद्वारे महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वक्त केलीय.

बाळासाहेबांसाठी राज यांचे मनसैनिक बाप्पांकडे धावले...

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:04

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गेली काही दिवस जास्तच खालावल्याने राज्यभरातील त्यांचे चाहते आणि शिवसैनिक त्यांच्या प्रकृती विषयी चिंतेत आहेत.

फार्म हाऊसमध्ये एकाच वेळी चौघांचा खून

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 15:34

पनवेलजवळच्या शिरवली गावात 4 जणांची हत्या झाली आहे. शिरवलीजवळ असणा-या एका फार्म हाऊसवर हे मृतदेह सापडलेत.