असुर्डे रेल्वे स्थानकाबाबत बैठक

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 17:31

कोकण रेल्वेमार्गावर संगमेश्वर तालुक्यात असुर्डे येथे रेल्वे स्थानक उभारण्याच्या मागणीबाबत दोन दिवसांत बैठक बोलविण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली असुर्डे येथील ‘रेल रोको’ करण्यात आले होते.

पेणमध्ये गणेशमूर्तीतून २० कोटींची उलाढाल

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 22:25

गणपती मूर्ती तयार करण्यासाठी पेण प्रसिद्ध आहे. येथील गणेश मूर्ती देश-विदेशात नेल्या जातात. या ठिकाणी तब्बल ४५० कार्यशाळांमधून ११ लाखांहून अधिक गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. यातून यावर्षी २० कोटीं रूपयांची उलाढाल झाली आहे.

गणेशोत्सवासाठी जड वाहनांना बंदी

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 16:58

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि गतीशील होण्याकरिता १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव पोलिसांकडून शासनास पाठवण्यात आला आहे. याआधी जड वाहनांना, अशी बंदी घालण्यात आली होती.

तळोजात तुरूंगाधिका-यावर गोळीबार

Last Updated: Monday, September 10, 2012, 12:26

नवी मुंबईतल्या तळोजा इथं गोळीबार झाल्याची घटना घडलीय.तळोजा जेलच्या तुरूंगाधिका-यावर गोळीबार झालाय. भास्कर कचरे असं या अधिका-याचं नाव आहे.

शौचालयाच्या ढिगाऱ्याखाली दोनजणांचा मृत्यू

Last Updated: Sunday, September 9, 2012, 23:42

भिवंडीतील नागाव परिसरात सार्वजनिक शौचालय कोसळून त्यात ढिगा-याखाली दोन जणांचा मृत्यू झालाय. तर ४ जण जखमी झालेत. जखमींवर भिवंडीतील IGM या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मी मांडवलीचे धंदे करत नाही- राज

Last Updated: Sunday, September 9, 2012, 20:45

ठाण्यात मराठी कलाकारांचा मराठमोळा थाट पाहायला मिळाला...निमित्त होतं मिफ्ता महोत्सवाच्या कलाकारांच्या दिंडीचं...महेश मांजरेकर आणि त्यांच्यासोबत मराठी कलाकारांचा जल्लोष इथे पाहायला मिळाला..ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात हा महोत्सवात राज ठाकरे यांच्या भाषणाने रंगत आणली.

गुन्हा दाखल : जितेंद्र आव्हाड मोकाट

Last Updated: Thursday, September 6, 2012, 22:21

झोपडपट्टीवासीयांसाठी तब्बल दीड तास रेल्वे रोको करुन हजारो प्रवाशांना वेठिस धरणा-या आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र त्यांना अजूनही अटक झालेली नाही. ते राजकीय नेते असल्याने त्यांना पोलीस अटक करण्यास धजावत नसल्याने ते मोकाट आहेत.

भटक्या कुत्र्याच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, September 6, 2012, 14:47

नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात एका कुत्र्याच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्याच्या शेपटीला फटाका लावून त्याला गंभीर दुखापात केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणीप्रेमी असलेल्या आदिती लाहिरींनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.पोलीसांनी याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 17:45

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनप्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह ६८ जणांवर कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाण्याजवळ आव्हाडांचा रेलरोको; प्रवासी वेठीला

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 11:05

ठाणे ते कळवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच ‘रेले रोको’ आंदोलन केलंय. मफतलाल झोपडपट्टी वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय.