`मरे` विस्कळीत; कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:35

कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.

डोंबिवलीत गॅसगळती, महिलेचा मृत्यू

Last Updated: Saturday, September 1, 2012, 12:09

डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात गॅसगळती झाली आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गॅसगळतीमध्ये १ महिलेसह ४ ते ५ कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे.

दलालांनी लाटली तब्बल पाच कोटींची जमीन

Last Updated: Thursday, August 30, 2012, 18:09

६० वर्षे शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची जमीन, सरकार दरबारी एका इस्त्रायली नागरिकाच्या नावावर झाल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आलाय.

‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ला सुरूवात

Last Updated: Sunday, August 26, 2012, 09:19

महाराष्ट्रातील नामवंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या धावपटूंचा सहभाग असलेल्या २३व्या ठाणे महापौर ‘वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेला सुरूवात झाली आहे.

`ठाणे मॅरेथॉन` शिवसेनेचीच?

Last Updated: Saturday, August 25, 2012, 23:16

`ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन` पुन्हा राजकीय वादात अडकलीय. ही मॅरेथॉन पालिकेची नसून शिवसेनेची असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर सर्वच पक्षाच्या नेत्यांना यात सहभागी करून घेत असल्यानं होणारा आरोप चुकीचा असल्याचा दावा महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केलाय.

बाप्पा आले घरी...

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 12:04

टिळक पंचांगानुसार काल संपूर्ण कोकणात गणेशोत्सवास सुरुवात आली आहे. अनेकांनी मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली. यामुळे कोकणातील वातावरण मंगलमय झालंय.

गणपतीपुळ्यात सात जणांचा बुडून मृत्यू

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:27

गणपतीपुळे येथील समुद्रात बुडालेल्यांपैकी आणखीन दोन पर्यटकांचे मृतदेह सापडले. त्यामुळे गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्यांची संख्या सात झाली आहे.

सिव्हिल हॉस्पिटल की मृत्यूचं दार?

Last Updated: Sunday, August 19, 2012, 12:33

ठाण्यातलं सिव्हील हॉस्पीटल नवजात बालकांसाठी मृत्यूचे दार ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या सात महिन्यांत या हॉस्पीटलमध्ये तब्बल 78 बालकांचा मृत्यू झालाय.

गणपतीपुळ्यात सहा बुडाले , चौघांचे मृतदेह हाती

Last Updated: Saturday, August 18, 2012, 21:19

सहलीसाठी आलेल्या तरूणांवर लाटा जीवावर बेतल्या. गणपतीपुळे समुद्रात सहाजण बुडाले असून यापैकी चार जणांचे मृतदेह हाती लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

अजूनही स्थायी समिती नाहीच, ठाणेकर संतप्त

Last Updated: Saturday, August 18, 2012, 09:36

ठाणे पालिकेच्या स्थायी समितीसाठी राजकारण्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमुळं सामान्य जनतेचे हाल होत आहेत. निधी अभावी अनेक कामं रखडली आहेत. त्यामुळं संतप्त ठाणेकरांनी नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिलाय.