बबली-बंटीने लाखोंना ११०० कोटींना गंडविले

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 11:54

सहा महिन्यांत पैसे दुप्पट देण्याचे आमिष दाखवून देशभरातील तब्बल दोन लाख लोकांना गंडा घालणार्याप नागपुरातील एका जोडप्याला रत्नागिरीत पोलिसांनी अटक केली आहे. बबली-बंटीच्या अटकेनंतर तब्बल ११०० कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या बबली-बंटींने आणखी किती जणांना गंडविले त्याची माहिती अजून पोलिसांनी उघड केलेली नाही.

माझा बळी घेणारा पैदा व्हायचाय -अजित पवार

Last Updated: Friday, November 9, 2012, 15:34

जलसिंचनाबाबत माझ्यावर झालेल्या आरोपांची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कुणाच्या दबावाला झुकून मी राजीनामा दिला नसून भ्रष्टाचाराच्या कुंडात माझा बळीही गेलेला नाही. माझा बळी घेणारा अजूनपर्यंत पैदा झालेला नाही, असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे काँग्रेसवर साधला.

ठाण्यात माव्यात भेसळ, पाच ठिकाणी धाड

Last Updated: Thursday, November 8, 2012, 12:40

दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात एफडीएने पाच ठिकाणी छापे टाकून बारा लाखांचा मावा जप्त करण्यात आला आहे. हा मावा भेसळयुक्त असल्याचे पुढे आले आहे.

कोकणात समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 10:39

कोकणातील रत्नागिरीत दापोली तालुक्यातल्या समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन होऊ लागलंय. त्यामुळं विक एन्डची रंगत अधिकच वाढलीये. पर्यटकांसाठी हा वेगळा अनुभव ठरतोय.

नगरपरिषद निवडणूक : ठाण्यात राष्ट्रवादीची सरशी

Last Updated: Monday, November 5, 2012, 14:22

ठाणे जिल्ह्यातील जव्हार नगर परिषदेचा निकाला जाहीर झालाय. जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे.

महापौराचं वराती मागून घोडं, करतायेत पिकनीक

Last Updated: Friday, November 2, 2012, 21:21

`वराती मागून घोडं` असं KDMC च्या महापौर, नगरसेवकांच्या हाँगकाँग दौ-याचं वृत्त `झी 24 तास`नं नुकतंच दाखवलं होतं तरीही महापालिकेनं यातून काहीच धडा घेतलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर सर्वाधिक गुन्हेगार - माणिकराव

Last Updated: Friday, November 2, 2012, 18:55

एखाद्या पक्षात सर्वात जास्त गुन्हेगार शोधायचे झाल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सापडतील, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

सेना आमदार सरनाईक अडकले पाणीचोरीच्या आरोपात?

Last Updated: Thursday, November 1, 2012, 23:47

ठाण्यातल्या विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीवरुन पालिका आयुक्त आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात चांगलीच जुंपलीय.

वाहनांचं बनावट इन्शुरन्स बनवणारी टोळी गजाआड

Last Updated: Thursday, November 1, 2012, 08:31

वाहनांचं बनावट इन्शुरन्स बनवणाऱ्या टोळीला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गजाआड केलीये. एका सायबर कँफेमध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचे इन्शुरन्स काढून वाहनाधारकांची ही टोळी फसवणूक करायची.

जैतापूर प्रकल्पाचे काम फेब्रुवारीनंतर

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 19:19

कोकणातील राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकत्पाचे काम फेब्रुवारीनंतर सुरु होणार असल्याचं अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर के. सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. अणु ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु होण्यास आता कुठलाही अडथळा नसल्याचे ते म्हणाले.