राज्यात पावसाचं धुमशान, पुराचा तडाखा

Last Updated: Friday, August 2, 2013, 12:27

राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.

विदर्भात ओला दुष्काळ, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Last Updated: Thursday, August 1, 2013, 17:53

विदर्भातल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर मदत जाहीर केलीय. अतिवृष्टीवरील चर्चेला उत्तर देताना मदत जाहीर केलीय. यंदा विदर्भात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.

स्वतंत्र विदर्भाची मागणी अधिक आक्रमक

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 21:06

तेलंगणा राज्याच्या निर्मिती प्रक्रियेला वेग मिळाला असतानाच आता वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर पकडलाय.. आज नागपूरच्या टेम्पल रोड परिसरात भाजप, शेतकरी संघटना आणि विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले आंदोलन केलं

मनसेचा नागपूरमध्ये राडा

Last Updated: Monday, July 29, 2013, 13:41

नागरी सुविधा देण्यास नागपूर पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने नागरिकांचा पारा चढला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यालयाला टार्गेट केले. कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये मनसेचे झेंडे होते.

मंत्र्यांचा ‘पूरग्रस्त’ विदर्भ दौरा!

Last Updated: Sunday, July 28, 2013, 11:54

विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला.

साचलेल्या पाण्याला रहिवासीच जबाबदार!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 20:45

इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्यास त्यासाठी रहिवाशांना जबाबदार ठरवण्याचा निर्णय नागपूर महापालिकेनं घेतलाय. पालिकेच्या या निर्णयावर नागपूरकरांनी नाराजी व्यक्त केलीय.

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:29

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...

नागपूरमध्ये गोळीबार, एक गंभीर

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 10:39

नागपूरमधल्या फ्रेंड्स कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

बाप्पाच्या तलाव विसर्जनाला बंदी!

Last Updated: Monday, July 22, 2013, 12:59

एकिकडे संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगर पालिकेने बाप्पाच्या सर्वच प्रकारच्या मूर्तींच्या तलावात विसर्जनावर बंदी आणली आहे.

`त्या`नं झुगारली जातपंचायतीची बंधनं अन्...

Last Updated: Monday, July 22, 2013, 12:41

आंतरजातीय विवाह केला म्हणून वाळीत टाकण्यात आला... समाजाच्या भीतीने आई-वडिलांनीही संबंध तोडायला भाग पाडलं...