विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी

Last Updated: Sunday, December 30, 2012, 21:18

गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.

दोघांचं भांडण... तिसऱ्यानंच गमावला जीव

Last Updated: Friday, December 28, 2012, 21:55

दोघांच्या भांडणात तिसऱ्याला जीव गमवावा लागल्याची घटना नागपूरातल्या योगेशनगरमध्ये घडलीय. भाडेकरु पती-पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अनिरुद्ध शेंडे यांची हत्या करण्यात आलीय. नागपुरात गेल्या महिनाभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

अल्पवयीन तरूणीवर बलात्कार, बाप-आतेभाऊ अटकेत

Last Updated: Friday, December 28, 2012, 12:18

नागपुरात सख्ख्या बापाने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बापाच्या अत्याचारांना कंटाळून आतेभावाकडं आश्रयाला गेलेल्या या मुलीवर आतेभावानंही बलात्कार केला आहे.

भोंदुबाबाने मंत्रोच्चाराच्या बहाण्याने महिलेवर रेप

Last Updated: Thursday, December 27, 2012, 14:58

मंत्रोपचाराच्या बहाण्यानं एका भोंदूबाबानं एका महिलेवर बलात्कार केला आहे. भंडाऱ्यातल्या लाखांदूर तालुक्यातल्या किरमटी गावात ही घटना घडली आहे.

बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 20:03

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण 100 टक्के कोरडं झाल्यानं डिसेंबर महिन्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलीय. शहरात 20 ते 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे महिला वर्गावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीय.

गावगुंडांना वैतागून महिलांचा रात्री पोलीस चौकीतच मुक्काम

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 19:33

यवतमाळच्या पारवा गावातल्या महिलांनी वडगाव रोड पोलीस चौकीमध्ये रात्रभर मुक्काम ठोकला आणि गावगुंडाकडून वाचवण्याची पोलिसांना गळ घातली. गेल्या वर्षभारापासून महिलांना गावगुंडांच्या छेडछाडीचा सामना करावा लागतोय.

या पुढे फक्त `केजी स्कूल`ना परवानगी नाही

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 16:21

जागोजागी उभ्या राहात असलेल्या केजी स्कूलना आता आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी यासंदर्भात नवी घोषणा केली. यापुढे सेल्फ पायनान्स स्कूल्सना केवळ केजी पुरता परवानगी मिळाणार नाही.

राज ठाकरे जरा महाराष्ट्राकडेही बघा - राणे

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 13:40

`नेहमी गुजरातची प्रगती पाहणाऱ्या राज ठाकरेंनी जरा महाराष्ट्राच्या प्रगतीकडे पाहावं` असं म्हणत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.

शिवसेनेत आता राहिलेय कोण, भवितव्य काय सेनेचं? - राणे

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 12:50

उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. शिवसेनेमध्ये कोणीही बोलणारं राहिलेलं नाही.

समुद्रातील स्मारकाचं काय, काँग्रेस आमदारांचा सवाल

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 19:42

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाला विलंब का होतोय असा सवाल काँग्रेस आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित केलाय.