मनसेचा नाशिक, औरंगाबादमध्ये जल्लोष

Last Updated: Thursday, March 15, 2012, 17:01

नाशिकमध्ये महापौरपदी मनसेचा उमेदवार बसणार हे पक्कं झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला. वाद्यांच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते, त्यांच्या हातात फडकणारे मनसेचे झेंडे आणि जयजयकाराच्या घोषणा यांनी नाशिकमधलं वातावरण दुमदुमून गेल होते.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- राज

Last Updated: Thursday, March 15, 2012, 15:10

नाशिक महापालिकेच्या सत्तासंपादनानंतर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतलीय. नाशिकचा विकास करुन दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

नाशिकमध्ये मनसेचा 'वाघ' महापौर

Last Updated: Thursday, March 15, 2012, 15:40

नाशिकच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कंठापूर्वक निवडणूक म्हणून पाहत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिल्याने यतीन वाघ हे महापौर पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपचे सतीश कुलकर्णी यांना उपमहापौर पदाची लॉटरी नव्या राजकीय समिकरणामुळे लागली आहे.

भाजपचा पाठिंबा, नाशकात मनसेचा महापौर

Last Updated: Thursday, March 15, 2012, 11:06

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतची आज घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे. या पाठिंब्यामुळे नाशकात मनसेचा पहिला महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिकच्या महापौरपदाचा आज निर्णय

Last Updated: Thursday, March 15, 2012, 09:26

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या मनसेनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपनंही मनसेला साथ देण्याचं ठरवलं आहे. मात्र शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही.

शिर्डी संस्थान समितीला दणका

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 09:04

शिर्डी संस्थानची समिती बरखास्त करुन येत्या १५ दिवसांत नवीन समिती स्थापन करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सरकारला दिलाय. १५ दिवसांत राज्य सरकारनं ही समिती नेमली नाही, तर साई संस्थानाची सूत्र ३ सदस्यीय समितीकडे जाणार आहेत. दररोज एक कोटी रुपयांचं उत्पन्न असलेल्या शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांना हा दणका मानण्यात येत आहे.

शिवसेना मनसेला पाठिंबा देणार?

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 16:12

नाशिकमध्ये महापौरपदासाठी शिवसेना मनसेला पाठिंबा द्यायची शक्यता आहे. याबाबत संध्याकाळपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता आहे. एकीकडे महापौरपदासाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु असताना भाजपही त्यासाठी प्रयत्न करत आहे.

पाच महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 16:18

पाच महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी जाहीर केला आहे. भिवंडी, परभणी, लातूर, मालेगाव आणि चंद्रपूर या महापालिकांसाठी पंधरा एप्रिलला मतदान होणार आहे.

नाशिकमध्ये महापौर मनसेचा की भाजपचा?

Last Updated: Monday, March 12, 2012, 23:16

नाशिक महापालिकेच्या सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे महायुतीचा धर्म पाळणार, असं भाजप म्हणत आहे. तर त्याचवेळी जनादेशाचा आदर राखला जाईल, असं म्हणत मनसेला पाठिंब्याचे संकेतही भाजपनं दिले आहेत.

घोटाळा लपवण्यासाठीच जैनांचे पक्षांतर- खडसे

Last Updated: Monday, March 12, 2012, 15:43

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सुरेशदादा जैन यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. घोटाळ्याची माहिती शिवसेना-भाजपला होती. तसंच घोटाळा लपवण्यासाठीच जैन यांनी पक्षांतर केलं असल्याचं खडसेंना सांगितलं.