झेडपीत नवी समीकरणं उदयास

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 20:31

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नवी राजकीय समीकरणे उदयाला आलीत. काँग्रेसला ठिकठीकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं दणका दिलाय.यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं दणका दिलाय.

जैन यांच्या कार्यंकर्त्यांची डॉक्टरला मारहाण

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 12:25

जळगावमध्ये शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह एका कार्यकर्त्याने जैन यांच्या डॉक्टरला मारहाण करून अर्वाच्च शिवीगाळ केल्याची तक्रार जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. ए. जी. राठोड यांनी केली आहे.

शिर्डी साईबाबांच्या दर्शन रांगेत भक्ताचा मृत्यू

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 11:57

शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शन रांगेत भक्ताचा मृत्यू झाला आहे. रात्री दर्शन रांगेत झोपलेला असताना भक्ताचा मृत्यू झाला आहे. सुनील चौरसिया असं या भक्ताचं नाव असून तो मुंबईचा रहिवासी आहे.

सुरेश जैन यांची 'बायपास' होणार

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 07:56

शिवसेनेचे आमदार सुरेश जैन घरकुल घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहेत. मात्र सोमवारी रात्री त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाल्यानं त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मनसेची नाशिकमध्ये गोची!

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 21:33

नाशिक महापालिकेतील सत्तास्थापनेनंतर मनसेसमोर आता आव्हानांचा डोंगर उभा आहे. जकात खाजगीकरणाच्या मुद्द्यावर मनसेची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झालीय. निवडणुकीच्या प्रचारात मनसेनं जकात खासगीकरण रद्द करण्याची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टीचं ठिय्या आंदोलन

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 12:43

कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी संघटनेनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज ठप्प आहे.

जैन यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात रवानगी

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:35

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिले आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये पर्यटक महिलेवर बलात्कार

Last Updated: Sunday, March 18, 2012, 12:26

नाशिकमधील गुन्हेगारीचे पेव आता तीर्थस्थळ त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहचू लागलेत. त्र्यंबकेश्वरमध्ये एका पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाच स्थानिक तरूणांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव रुग्णालयाबाहेर सेना,मनसेचं आंदोलन

Last Updated: Saturday, March 17, 2012, 15:07

जळगावातल्या जिल्हा सरकारी रुग्णालयातल्या मेडिकल ऑफिसर डॉ.विजया चौधरी यांच्या हत्या प्रकरण आता चांगलंच तापत आहे. या हत्येप्रकरणी शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला धारेवर धरलं आहे.

घरकुल घोटाळा प्रकरणातील एकाची आत्महत्या

Last Updated: Saturday, March 17, 2012, 08:48

जळगावातल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळाप्रकरणी पोलीस चौकशीला सामोरं गेलेल्या माजी पंचायत समिती सदस्याने आत्महत्या केली आहे. रामकृष्ण शिवराम सपकाळे असं त्याचं नाव आहे.