जैनांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगाव बंद

Last Updated: Monday, March 12, 2012, 09:12

शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज जळगाव बंदची हाक दिलीय. जैन यांना पोलिसांनी दंडुकेशाहीच्या जोरावर अटक केल्याचा आरोप जैन समर्थकांसह शिवसेनेनं केला आहे.

धुळे-जळगावातील शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाला विरोध

Last Updated: Sunday, March 11, 2012, 15:47

धुळे आणि जळगावात कच्च्या तेलाचे साठे आढळून आलेत. तेलाचे साठे काढण्यासाठी गावक-यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी विहीर खणण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरु केलेल्या जमिन अधिग्रहणाला गावक-यांनी विरोध केला आहे.

सुरेशदादांची १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

Last Updated: Monday, March 12, 2012, 09:08

सुरेशदादा जैन यांना काल मध्यरात्री अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

सुरेशदादा जैन यांना अटक

Last Updated: Sunday, March 11, 2012, 07:39

शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव नगरपालिकेतील २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणातील सहभागा प्रकरणी सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे.

नाशिकची राज्यराणी एक्सप्रेस मार्गस्थ

Last Updated: Saturday, March 10, 2012, 22:58

गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेली राज्यराणी एक्सप्रेस आजपासून मार्गस्थ झाली. नाशिकहून सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी निघणा-या या रेल्वेमुळं चाकरमान्यांना कार्यालयीन वेळेत मुंबईत पोचणं शक्य होणार आहे.

नगरमध्ये बिबट्या मादी जेरबंद

Last Updated: Saturday, March 10, 2012, 19:37

संगमनेर तालुक्यातल्या रायतेवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या मादी जेरबंद झाली. या मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तिच्याच बछड्यांचा उपयोग केला आणि बछड्यांच्या ममत्वापोटी ती मादी अलगद पिंज-यात अडकली गेली. मात्र, असं असलं तरी मातेपासून दुरावलेल्या या बछड्यांना पुन्हा मायेची उब मिळाल्यानं ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

कापसाबाबत निर्णयास विलंब - शरद पवार

Last Updated: Saturday, March 10, 2012, 19:52

कापसावरील निर्यातबंदी लवकरच उठवली जाण्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. कापसाच्या निर्यातबंदीच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप शरद जोशींनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना हे पोरकटपणाचे आरोप असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका सुरु असल्याकारणाने निर्णय घेण्यात विलंब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नाशिकमधील नगरसेवक अज्ञातस्थळी

Last Updated: Saturday, March 10, 2012, 15:22

नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी सर्वच पक्ष आपल्या नगरसेवकांची काळजी घेताना दिसत आहेत. शिवसेनेचे नगरसेवकही अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

मनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!

Last Updated: Friday, March 9, 2012, 17:44

मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत

मनसेला पाठिंबा देण्याचे भाजपचे संकेत

Last Updated: Friday, March 9, 2012, 19:48

नाशिकमध्ये जनादेशाचा आदर केला जाईल असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेनेनं महापौरपदासाठी दावा केला आहे. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशीची चर्चा आहे.