साईंच्या पालखीत पोलिसाची अरेरावी; महिलांनाही शिवीगाळ

साईंच्या पालखीत पोलिसाची अरेरावी; महिलांनाही शिवीगाळ

Last Updated: Friday, November 8, 2013, 12:05

ण्याचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी महिलांशी अरेरावी केल्याचं समोर आलंय. रानडे यांनी महिलांना शिवीगाळ करत महिलांना मारहाणही केलीय. स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडला.

पुण्यातील मॉडर्न कॅफेला आग

पुण्यातील मॉडर्न कॅफेला आग

Last Updated: Thursday, November 7, 2013, 16:33

पुण्यातल्या अत्यंत गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावरच्या मॉडर्न कॅफेला सकाळी दहाच्या सुमारास हॉटेलमधल्या भटार खाण्यात आग लागली होती. आगीत हॉटेलचं नुकसान झालंय मात्र, कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

‘त्या’ चार मित्रांना मिळाली जलसमाधी

‘त्या’ चार मित्रांना मिळाली जलसमाधी

Last Updated: Thursday, November 7, 2013, 18:22

पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळालंय. या चारही मित्रांना जलसमाधी मिळाली. चौघांचेही मृतदेह नीरा नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागला. याच गाडीत तिघांचे मृतदेह आढळले आहेत.

‘त्या’ तरुणांची गाडी सापडली, तिघं कुठे?

‘त्या’ तरुणांची गाडी सापडली, तिघं कुठे?

Last Updated: Thursday, November 7, 2013, 13:10

पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उलगडण्याची शक्यता आहे. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागलाय. नीरा नदीच्या पात्रात दोन पुलांच्यामध्ये पाण्याखाली ही गाडी सापडलीय.

काय म्हणावं याला, लहान मुलांपासून प्रौढांना उलटं टांगलं जातंय!

काय म्हणावं याला, लहान मुलांपासून प्रौढांना उलटं टांगलं जातंय!

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 23:57

२१ व्या शतकामध्ये भारतानं मंगळावर उपग्रह पाठवून विज्ञानाच्या क्षेत्रातली प्रगती सिद्ध केलीय.. पण मंगळावर जाणा-या देशात अजून काय सुरू आहे, त्याची ही धक्कादायक बातमी. बाबीर बुवाचा नवस फेडण्यासाठी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांना उलटं टांगलं जातंय.

श्रुतिकानं सांगितलं मी कोल्हापूरला येतेय, पण...

श्रुतिकानं सांगितलं मी कोल्हापूरला येतेय, पण...

Last Updated: Thursday, November 7, 2013, 07:18

पुण्यातून पाच दिवसांपूर्वी गायब झालेल्या चौघांपैकी एक तरुण, चिंतन बूच याचा मृतदेह सापडलाय. नीरा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. पुणे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अन्य दोन तरुण आणि एका तरुणीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, श्रुतिकानं आदल्याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि दुस-या दिवशी घरी येणार, असं कोल्हापूरला घरच्यांना कळवलं होतं. पण दुस-या दिवळी श्रुतिका पोहोचलीच नाही.

‘त्या’ तरुणांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नदीत सापडला

‘त्या’ तरुणांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नदीत सापडला

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 12:59

पुण्यातल्या गायब झालेल्या तरुणांपैकी चिंतन बुच या तरुणाचा निरा नदीत मृतदेह सापडलाय. चार दिवसांपूर्वी पुण्याहून निघालेले चार तरुण अचानक बेपत्ता झाले होते. त्यात एका तरुणीचाही समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. इतर तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.

लोणावळा भीषण अपघातात तीन महिला ३ ठार, सात जखमी

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 18:55

लोणावळा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.

माझी कातडी बधिर झाली आहे- शरद पवार

माझी कातडी बधिर झाली आहे- शरद पवार

Last Updated: Monday, November 4, 2013, 22:03

माझी कातडी आता बधिर झाली आहे, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले.

बारामतीजवळच्या मुर्टी गावाची व्यथा, पवार साहेबांचं लक्ष कुठे?

बारामतीजवळच्या मुर्टी गावाची व्यथा, पवार साहेबांचं लक्ष कुठे?

Last Updated: Monday, November 4, 2013, 14:55

गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळं पिचलेल्या जनतेला यंदा पावसानं दिलासा दिला. मात्र आकाशातून पडलेलं पाणी केवळ कागदोपत्रीच साठवलं गेल्याचं चित्र अनेक भागात दिसतंय. पाझर तलाव आहेत, पण कोरडे... बारामतीजवळ असलेल्या मुर्टी गावाची ही व्यथा कमी-अधीक प्रमाणात अनेक ठिकाणी भेडसावतेय. याविरोधात एका अंध व्यक्तीनं आवाज उठवलाय.