Last Updated: Saturday, August 17, 2013, 22:38
सोलापूरसह पाच जिल्ह्यांना वरदायी ठरलेलं उज्जनी धरण १०० टक्के भरलंय. गेल्या सहा वर्षात हे धरण पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यातच भरलंय.
Last Updated: Saturday, August 17, 2013, 14:47
पुण्यात भटक्या कुत्रांचा त्रास वाढलाय.महापालिकेच्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. प्रत्येक महिन्याला बाराशेहून अधिक पुणेकरांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं महापालिकेला शक्य होत नाही.
Last Updated: Saturday, August 17, 2013, 12:06
पुण्यामध्ये स्वारगेट पोलिसांनी ३ पिस्तुलं आणि १५ काडतुसं जप्त करण्यात आलेत. संतोष बो़डके या व्यक्तीकडून ही पिस्तुलं पकडण्यात आलीयेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मनिषा बोडके यांचा संतोष हा पती आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय.
Last Updated: Saturday, August 17, 2013, 10:50
आगामी निवडणुकांच्या जागावाटप संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.
Last Updated: Friday, August 16, 2013, 15:16
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेला विवस्त्र करून तब्बल सहा तास मारहाण करून विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Last Updated: Thursday, August 15, 2013, 23:04
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आता पाहूया एका बंडाची कहाणी... १८५७ च्या उठावानंतर इंग्रजी दडपशाहीची कोंडी यशस्वीपणे फोडण्याचा प्रयत्न झाला, तो सांगली जिल्ह्यातील बिळाशीच्या `बंडाच्या` रूपाने.
Last Updated: Thursday, August 15, 2013, 16:10
गेल्या ६६ वर्षात सांगली जिल्ह्यातील १५७ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. यापैकी एका शहीद जवानाच्या माता-पित्यांवर उतारवयात उपासमारीची वेळ आलीय.
Last Updated: Thursday, August 15, 2013, 00:02
ऐतिहासिक कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणार रंकाळा तलाव. मात्र आज हा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडलाय. पाण्यात वाढलेलं शेवाळं कुजलंय. त्यामुळे सगळं पाणी अक्षरशः हिरवं झालंय. मनपाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा खराब झालाच आहे. पण नागरिकांचं आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.
Last Updated: Tuesday, August 13, 2013, 23:41
कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना सामान्य नागरिकांना महागाईतून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून पुण्यात स्वस्त दारात कांदा विक्री करण्यात येत आहे.
Last Updated: Tuesday, August 13, 2013, 20:07
पुण्यामध्ये वैशाली बनकर यांच्याकडून पक्षानं महापौरपदाचा राजीनामा घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही महापौर बदलाचं वारं वाहू लागलंय. अजित पवारांनीच तसं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता त्यांनी ते पूर्ण करावं, असा सूर उमटू लागलाय.
आणखी >>