`ओशो`ची पुण्यातील ३०० कोटींची मालमत्ता हडप?

Last Updated: Saturday, August 10, 2013, 13:07

पुण्यातील ओशो आश्रमच्या मालकीची तब्बल ३०० कोटींची मालमत्ता ओशो आश्रमच्या विश्वास्तांनीच हडप केल्याचा आरोप ओशोंचा जुन्या अनुयायांनी केलाय. याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून काहीच कारवाई नं झाल्यानं काही शिष्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय.

भिकाऱ्यांच्या `सिरीयल किलर`ला अटक

Last Updated: Friday, August 9, 2013, 19:48

शिर्डीतल्या तिहेरी हत्येप्रकरणी आज पोलिसांनी एका संशयितास अटक केलीय. संतोष रामदास अलकोल असं त्याचं नाव आहे. तो नगसरसुलचा राहणारा आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर चार ठार

Last Updated: Saturday, August 10, 2013, 06:39

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळ्यानजीक आज झालेल्या अपघातात मुंबईतील चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी झाला.

शहीद मानेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री अनुपस्थित

Last Updated: Friday, August 9, 2013, 08:00

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही मानेंच्या अंत्यसंस्कारावरून राजकारण सुरू झालंय.शहीद कुंडलीक माने यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित होते. याच मुद्यावर बोट ठेवत राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.

चिंटू असंच सुरू राहावं, व्यंगचित्रकार राज ठाकरेंची इच्छा!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 21:44

हास्यचित्रांच्या माध्यमातून वाचकांच्या घराघरात पोचलेला `चिंटू` यापुढेही सुरुच राहावा अशी इच्छा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी व्यक्त केलीय.

मावळ घटनेला २ वर्षं पूर्ण!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 19:55

मावळ गोळीबाराची घटना 9 ऑगस्ट 2011 ला घडली. त्याला उद्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हे आंदोलन घडण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या.

राज ठाकरेंना चारही गुन्ह्यांत जामीन मंजूर!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 15:06

साताऱ्यात २००८ साली प्रक्षोभक भाषण केल्यामुळे झालेल्या तोडफोडीनंतर दाखल झालेल्या चार गुन्ह्यांवरून आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हा न्यायालयात हजेरी लावली.

शहीद कुंडलिक माने अनंतात विलीन

Last Updated: Thursday, August 8, 2013, 12:00

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तान सैन्यानं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव खुर्द इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये

Last Updated: Thursday, August 8, 2013, 09:23

पाकिसतान सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये दाखल झालंय. काल विशेष विमानानं मानेंचं पार्थीव दिल्लीहून पुण्यात आणण्यात आलं त्यानंतर पहाटे पार्थीव कोल्हापूरातील मराठा लाईट इन्फेन्ट्रीमध्ये दाखल झालं. आणि तिथून त्यांना पिंपळगावकडे रवाना करण्यात आलं.

शहीद कुंडलिक मानेंची इच्छा अपूर्ण...

Last Updated: Thursday, August 8, 2013, 13:49

भारतीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्हयातील पिंपळगांव बुद्रुक इथले जवान कुंडलीक माने शहीद झाले. या घटनेमुळं पिंपळगावसह कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरलीय. लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा मनाशी बाळगलेले कुंडलीक हे निवृत्तीनंतर गावातील मुलांसाठी बसची सोय करणार होते. पण त्यांची ही इच्छा अपूरीच राहिली.