संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’ हरपल्या

Last Updated: Thursday, August 8, 2013, 09:37

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जयमालाबाई शिलेदार यांचं पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. पहाटे 2 च्या दरम्यान पुण्यातल्या पं. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. जयमालाबाईंच्या निधनानं संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’च हरपल्या अशी प्रतिक्रिया संगीत क्षेत्रात व्यक्त होतेय.

नयना पुजारी हत्या प्रकरणात नवा खुलासा

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 12:23

पुण्यातील नयना पुजारी हत्या प्रकरणात एक नवा खुलासा झालाय. वकिलांनी सल्ला दिल्यानंतर जेलमधून पळाल्याची कबुली हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊतनं दिलीय.

विनयभंगाला प्रतिकार; मुलीला दिलं पेटवून!

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 09:06

एकतर्फी प्रेमातून मुलीला जाळण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या कामरगावमध्ये घडलीय. आपल्या घराशेजारीच राहणाऱ्या एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला पेटवून देण्याचा क्रूरपणा एका नराधमानं केलाय.

विधानसभेत आमदारांचं `ये रे माझ्या मागल्या...`

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 20:48

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन विविध करणांनी चांगलंच गाजलं. पण हे आंदोलन जनतेसाठी निराशाजनकच ठरलं. पिंपरी चिंचवड करांसाठी तर, ये रे माझ्या मागल्या सारखं हे अधिवेशन आलं आणि गेलं.

पुण्यात माकडांकडून मोबाईल चोरी

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 15:58

सध्या पुण्यात मोबाईलशी माक़डचेष्टा सुरू आहेत. पुण्यात वानरं दिसली तर लगेच सावध व्हा. कारण मोबाईल चोरणा-या वानरांची टोळी पुण्यात सक्रिय झालीय.

विद्यार्थ्यांच्या बेंच खरेदीतही घोटाळा!

Last Updated: Monday, August 5, 2013, 21:03

सहल घोटाळा, संगणक घोटाळा, कंपास पेटी घोटाळा... पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या घोटाळ्यांची ही मालिका. आता या मालिकेत आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय. विद्यार्थ्यांसाठीच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय.

मराठीत बोलला म्हणून, विवाहीत मुलीला शिक्षा!

Last Updated: Monday, August 5, 2013, 16:02

मुलीचा पिता मराठीतून बोलला म्हणून त्याच्यावर जात पंचायतीनं कारवाई केलीय. मिरजमधल्या बे़डगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.

अजित पवारांची कलमाडींवर टीका

Last Updated: Sunday, August 4, 2013, 22:14

पुण्यातील खड्ड्यांवरून खासदार सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रवादीच्या कारभारावर टीका केली होती. पुण्याच्या कारभा-यांनी मात्र कलमाडींच्या या टीकेला थेट उत्तर देण्याचे टाळलंय.

स्मारकांचं संरक्षण की मेट्रो प्रकल्प?

Last Updated: Sunday, August 4, 2013, 20:27

संरक्षित स्मारकाच्या १०० मीटर परिसरात कोणतही बांधकाम करण्यास मनाई आहे. त्यामुळे पुण्यातल्या स गो बर्वे चौकातल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय.

पारधी समाजात नामांतराची मोहीम

Last Updated: Monday, August 5, 2013, 07:35

जन्म देताना गरोदर महिलेला जी वस्तू दिसेल त्याचं किंवा ती महिला ज्या ठिकाणी गरोदर होते त्या ठिकाणाचं नाव देण्याची अनोखी पद्धत पारधी समाजात आहे.