पुणेकरांचं ८०० कोटींचं नुकसान!

Last Updated: Monday, April 29, 2013, 17:54

पीएमपीएल एक हजार नव्या बसेस खरेदी करत आहे. मात्र त्यासाठी सीएनजीऐवजी डिझेल बसेसचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या व्यवहारात पुणेकरांचं तब्बल ८०० कोटींचं नुकसान होणार आहे. शिवाय या व्यवहारात अनेक घोळ आहेत.

काँग्रेस सरकार नसेल तर देशाचं विघटन होईल- मुख्यमंत्री

Last Updated: Sunday, April 28, 2013, 22:19

देशाला मजबूत सरकारची आवश्यकता आहे, आणि ते फ़क़्त काँग्रेसच देऊ शकते, जर स्थिर सरकार मिळालं नाही, तर देशाचे विघटन होण्याची भीती असल्याचं धक्कादायक विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.

पिंपरी-चिंचवडमध्ये नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना!

Last Updated: Sunday, April 28, 2013, 17:36

नात्याला आणि मानवतेलाही काळीमा फासणाऱ्या दोन धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघड झाल्याने शहरवासीय सुन्न झालेत.

महामार्गावरील दोन अपघातांत ११ ठार

Last Updated: Sunday, April 28, 2013, 13:56

सोलापूर हैदराबाद महामार्गावर ट्रक आणि तवेरामध्ये झालेल्या अपघातात ९ ठार तर २ जण गंभीर जखमी झालेत. कर्नाटकातील हुमानाबादमध्ये हा अपघात झालाय.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाट्यावर

Last Updated: Sunday, April 28, 2013, 08:28

राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचा विश्वासघात केलाय. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचं नुकसान झालंय अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलीय.

पुण्यात पाणीबाणी

Last Updated: Saturday, April 27, 2013, 14:43

पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्याचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.

गारांचा पाऊस, चार जणांचा बळी

Last Updated: Saturday, April 27, 2013, 16:03

राज्यातल्या काही भागांना आज मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय. वीज पडून आज दिवसभरात चार जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, गारांचा पाऊस पडला.

हनुमान जयंती उत्साहात साजरी...

Last Updated: Thursday, April 25, 2013, 12:20

आज हनुमान जयंती श्रीरामचंद्र हा मर्यादा पुरुषोत्तम,त्याचा सेवक श्री हनुमान हा चिरंजीव दासोत्तम, सर्वशक्तीमान, महाधैर्यवान, संगीतशास्त्राचा प्रवर्तक.

मनसे महिला नगरसेवकाला दंड ठोठावलाय

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 10:21

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोटे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र निवडणूक आयोगाला सादर केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहीरट यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय. दंडाची ही रक्कम सहा आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

मृतदेहांची अदलाबदल!

Last Updated: Sunday, April 21, 2013, 21:14

अंत्यविधीसाठी नातेवाईक जमलेले, अंत्यविधीची तयारी सुरु आणि रुग्णालयातून आलेला मृतदेह दुसऱ्याच कोणा व्यक्तीचा असल्याच समोर आल्यावर काय घडेल?