पुण्याची जागा जिंकण्यासाठी `स्टार` प्रचारक

पुण्याची जागा जिंकण्यासाठी `स्टार` प्रचारक

Last Updated: Friday, March 28, 2014, 20:30

पुण्यातली जागा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. यासाठील पुण्यात `स्टार` प्रचारक उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची एक सभा पुण्यात होणार आहे.

मावळमधील सेनेचे श्रीरंग बारणे `मालामाल`

मावळमधील सेनेचे श्रीरंग बारणे `मालामाल`

Last Updated: Friday, March 28, 2014, 10:16

मावळ लोकसभा मतदार संघात कोण निवडून येणार हे सांगता येत नसलं तरी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी श्रीमंतीत मात्र बाजी मारलीय. श्रीरंग बारणे यांची एकूण मालमत्ता ६६ कोटी ९२ लाख रुपयांची असून, त्यांच्याकड एक रिव्हॉल्वरही आहे.

मतांचं विभाजन करण्यासाठीची अशी ही खेळी!

मतांचं विभाजन करण्यासाठीची अशी ही खेळी!

Last Updated: Thursday, March 27, 2014, 21:11

नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातं, पण निवडणुकीच्या रिंगणात नावाला बरंच महत्त्व असतं. एक सारखं नाव आणि आडनावाची उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर बलाढ्य उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. मावळ लोकसभा मतदार संघात एकाच नावानं असेच उमेदवार उभे राहिलेत. आता ते कोणी उभे केले? का केले? हे गुलदस्त्यात असलं तरी त्याचा फटका तुल्यबळ उमेदवाराला बसण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.

कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन

कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन

Last Updated: Thursday, March 27, 2014, 15:44

गुढी पाडवानिमित्ताने कोकण रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर आहे. या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावेल.

नाशिकमध्ये हॉटेलमध्ये मारामारी, तिघांचा मृत्यू

नाशिकमध्ये हॉटेलमध्ये मारामारी, तिघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, March 27, 2014, 13:30

नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात हॉटेलमालकाचाही समावेश आहे. हॉटेलमध्ये बुधवारी रात्री दारु पिऊन एका गटानं गोंधळ घातला. त्यात एकाच मृत्यू झालाय.

ट्रक-बस अपघातात दोन्ही वाहने पेटली, एकाचा होरपळून मृत्यू

ट्रक-बस अपघातात दोन्ही वाहने पेटली, एकाचा होरपळून मृत्यू

Last Updated: Thursday, March 27, 2014, 11:02

पुणे एक्सप्रेसवर तळेगाव दाभाडे टोलनाक्याजवळ भयानक घटना घडली. ट्रक आणि खासगी बस अपघातात एकाचा होरपळून मृत्यू तर दोन ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या अपघातानंतर बसचा कोळसा झालाय चर ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे

राणेंना मदत न करण्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाम

राणेंना मदत न करण्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाम

Last Updated: Thursday, March 27, 2014, 09:09

सिंधुदुर्गात नारायण राणेंना मदत करणार नसाल तर खड्यासारखे बाजूला करू असा इशारा उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला होता. तरीही कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नाहीत. वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ पण राणेंना मदत करणार नाही असा पवित्रा त्यांनी आता घेतलाय. सामंतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळलीय.

`रागिनी MMS -2’वर बंदी घाला- हिंदू संघटनेची मागणी

`रागिनी MMS -2’वर बंदी घाला- हिंदू संघटनेची मागणी

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 21:25

सनी लिऑनच्या ‘रागिनी एमएमएस टू’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीला हनुमान चालीसा म्हणण्यात आली आहे. अशा अश्लील चित्रपटात हनुमान चालीसाचा उल्लेख हा हिंदू धर्मिंयाचा अपमान असल्याचं हिंदू जनजागृती समितीनं म्हटलं आहे.

निम्हण रुसले,कोपऱ्यात बसले, सीएम गेले पुसायला!

निम्हण रुसले,कोपऱ्यात बसले, सीएम गेले पुसायला!

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 18:39

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सध्या स्वपक्षीय आमदाराची मनधरणी करण्याची पाळी आलीय. पुण्यातले काँग्रेसचे नाराज आमदार विनायक निम्हण यांची समजूत काढण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.

काँग्रेसचा का हाथ, खास आदमी के साथ

काँग्रेसचा का हाथ, खास आदमी के साथ

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 18:17

काँग्रेसचे `दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे` असावेत... भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची भाषा एकीकडे उपाध्यक्ष राहुल गांधी करतायत. तर दुसरीकडे आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने नांदेडमधून उमेदवारी दिलीय.