कोकणात शिवसेना नेत्यांचा राजकीय शिमगा

कोकणात शिवसेना नेत्यांचा राजकीय शिमगा

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 20:16

होळीचा सण संपला तरी कोकणातल्या शिवसेना नेत्यांमधला राजकीय शिमगा अजून सुरूच आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अनंत गिते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यातील धुसफूस अजून संपलेली नाही. उलट त्यांच्यातील संघर्ष आणखीच धुमसतोय.

योगेश घोलप बंडखोरी करणार? उमेदवारी अर्ज दाखल

योगेश घोलप बंडखोरी करणार? उमेदवारी अर्ज दाखल

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 18:00

शिर्डीमध्ये बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा झालेले बबनराव घोलप यांचे पूत्र योगेश घोलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते बंडखोरी करण्याची शक्यताय. तर शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी स्फोटात एक ठार

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 08:33

अंबरनाथच्या मोरीवली MIDCमध्ये अनथा ऑरगॅनिक्स कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट होउन भीषण आग लागली. यात कंपनीचे मालक सी. नायारण (63) जागीत ठार झालेत. तर पाच जण गंभीर जखमी झालेत. आगीत कंपनी पूर्णपणे जाळून खाक झालीये.

काँग्रेसचं `गरज सरो नी वैद्य मरो` - अंतुले

काँग्रेसचं `गरज सरो नी वैद्य मरो` - अंतुले

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 00:01

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळं बंडाचं निशाण फडकवलं आहे.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी फाशी कायम

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी फाशी कायम

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 22:02

नवी मुंबईत पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी दत्तात्रय रोकडे या नराधमाला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.

अमिता चव्हाण, डी.पी.सावंत यांचा अर्ज दाखल

अमिता चव्हाण, डी.पी.सावंत यांचा अर्ज दाखल

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 18:57

नांदेडमध्ये अद्याप काँग्रेसचा उमेदवार कोण हे ठरलेले नसले तरी अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता अशोक चव्हाण आणि पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

वडीलांनी केली बायको आणि दोन चिमुकल्यांची हत्या

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 14:20

औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एक धक्कादायक घटना घडलीय. वडिलांनीच आपल्या दोन मुलींचा आणि बायकोचा गळा आवळून खून केलाय. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडलाय.

भिंवडीत कपडा कंपनीला भीषण आग

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 17:53

भिवंडीमधील बालाजी कंपाऊडमधील तपस्या डाईंग या कापड कंपनीला सोमवारी रात्री उशीरा अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांच नुकसान झालंय.

जुन्नरमध्ये RTI कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

जुन्नरमध्ये RTI कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 12:44

जुन्नरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. विलास बारावकर असं आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. ते चाकणमधील रहिवासी होते. चाकणच्या राजगुरू परिसरातल्या सहकारी संस्थांचे घोटाळे त्यांनी उघडकीस आणले होते. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अस्पष्टता आहे.

राऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 09:25

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.