राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका

Last Updated: Friday, April 4, 2014, 12:30

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचा विदर्भात एल्गार तर राज ठाकरेंची तोफ नवी मुंबईत धडाडणार आहे.

मुंबईतील शक्तीमिल बलात्कार प्रकरणी आज शिक्षा सुनावणी

मुंबईतील शक्तीमिल बलात्कार प्रकरणी आज शिक्षा सुनावणी

Last Updated: Friday, April 4, 2014, 11:44

मुंबईच्या शक्तीमिल बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना कलम ३७६ ई च्या कलमाखाली दोषी ठरवण्यात आलंय. विजय जाधव, सलीम अन्सारी, कासीम बंगाली यांना या कलमा अंतर्गत दोषी ठरवण्यात आलंय. या आरोपींना आज सेशन कोर्टात शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

शिवसेना-मनसेच्या राड्यानंतर...कोणी फटकारले

शिवसेना-मनसेच्या राड्यानंतर...कोणी फटकारले

Last Updated: Friday, April 4, 2014, 11:11

शिवसेना-मनसेत मुंबईत झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि मनसेवर मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केलीय. शिवसेना आणि मनसे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असून आता लोकांना त्यांच्याकडून कोणत्याच अपेक्षा उरल्या नसल्याचा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगवालाय.

मुंबई गँगरेप : `त्या` नराधमांना फाशीची शक्यता

Last Updated: Thursday, April 3, 2014, 21:40

मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी आयपीसीच्या एका संशोधित कलमानुसार शक्ती मिल फोटो जर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन जणांना दोषी ठरवलंय.

ठाकरे बंधुंचं वाकयुद्ध राड्यातून रस्त्यावर!

Last Updated: Thursday, April 3, 2014, 20:21

शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात कुटुंब कलह सुरू झालाय तर त्यांचा झेंडा खांद्यावर घेणारे शिवसैनिक आणि मनसैनिक एकमेकांना भिडलेत. आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन, रस्त्यावर तुफानी राडा करतायत.

खूशखबर : आता घर घेणे शक्य, गृहकर्ज ९०%

Last Updated: Thursday, April 3, 2014, 14:50

तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे का? ते घेणे आता अधिक सोपे झाले आहे. नविन घरासाठी मिळणाऱ्या गृहकर्जात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही एक खूशखबर आहे. आता तुम्हांला घराच्या एकूण किंमतीतील ९० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज मिळू शकते. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक या प्रस्तावावर काम करत आहे.

मुंबईत शिवसेना-मनसेत रस्त्यावर जोरदार राडा

मुंबईत शिवसेना-मनसेत रस्त्यावर जोरदार राडा

Last Updated: Thursday, April 3, 2014, 13:40

मुंबईतील जुने कस्टम हाऊसजवळ शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य़कर्ते एकमेकांना भिडलेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी एकमेकांना खुन्नस दिल्याने कार्यकर्ते हातातील झेंडे घेऊन तुटून पडले. यावेळी पोलिसांना न जुमानता कार्यकर्ते भिडलेत.

शिवसेनेचा प्रचार धडाका, उद्धव ठाकरेंच्या १९ सभा

शिवसेनेचा प्रचार धडाका, उद्धव ठाकरेंच्या १९ सभा

Last Updated: Thursday, April 3, 2014, 12:49

शिवसेनेच्या प्रचाराचा धडाका उद्यापासून पाहायला मिळणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात दिसणार आहे. राज्यभरात तसा दौरा आखण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रचाराचेरणशिंग फुंकले आहे.

राणेंचा प्रचार नाही, दीपक केसरकर आक्रमक

राणेंचा प्रचार नाही, दीपक केसरकर आक्रमक

Last Updated: Thursday, April 3, 2014, 11:55

कोकणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. काँग्रेसनेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मदत न करण्याचा निर्णय सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगूनही दीपक केसरकर आक्रमक दिसत आहे. ते आपल्या निर्णयावर ठाम असून नीलेश राणेंचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलेय. दरम्यान, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार, अशी माहिती केसरकर यांनी दिलेय.

ठाकरे बंधूंमध्ये कटुता आणि गांधी बंधूंमध्ये गोडवा का वाढतोय?

Last Updated: Thursday, April 3, 2014, 09:01

गांधी घराण्यातील राहुल आणि वरूण या चुलत बंधूंमध्ये `भाईचारा` निर्माण होतोय. तर ठाकरे घराण्यातील उद्धव आणि राज यांच्यात मात्र जोरदार `भाऊबंदकी` रंगलीय. चुलतबंधूंमध्ये सुरू असलेल्या महाभारताचा लेटेस्ट एपिसोड.