शिवसेना पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज -शरद पवार

शिवसेना पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज -शरद पवार

Last Updated: Thursday, March 27, 2014, 19:16

ज्या पक्षाचे खासदार पक्ष सोडू जातात त्या पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलीय. डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपेंच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलाय.

मनसेला दणका, नगरसेविकेचे पद रद्द

मनसेला दणका, नगरसेविकेचे पद रद्द

Last Updated: Thursday, March 27, 2014, 17:38

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. विक्रोळीतील प्रभाग क्रमांक ११२ च्या नगरसेविका होत्या.

राणे-शिवसेनेत जुंपली, ...तर विष खाईन - रामदास कदम

राणे-शिवसेनेत जुंपली, ...तर विष खाईन - रामदास कदम

Last Updated: Thursday, March 27, 2014, 09:08

नारायण राणेंनी शिवसेना सोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली होती, असा रामदास कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. एकवेळ विष खाऊन मरेन, पण शिवसेना सोडणार नाही, असं कदमांनी राणे यांना ठणकावलं.

शरद पवारांकडून कधी मोदींची खिल्ली तर कधी पाठराखण

शरद पवारांकडून कधी मोदींची खिल्ली तर कधी पाठराखण

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 09:39

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध नेमके कसे आहेत, हे सांगणं अवघड झालंय. कारण कधी मोदींची गुपचूप भेट घेणारे, त्यांची स्तुती करणारे पवार आता त्यांच्यावर हल्ले चढवतायत.

`सिध्दिविनायक` आता ग्रंथरूपात भक्तांच्या भेटीला

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 08:44

मुंबईतला प्रसिध्द सिध्दिविनायक गणपती आता ग्रंथरूपानंही भक्तांच्या भेटीला येतोय. `श्री सिध्दिविनायक अनन्य साधारण ऊर्जा` या ग्रंथाचं मंगळवारी मुंबईत प्रकाशन झालं. या वेळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.

काँग्रेसचं `गरज सरो नी वैद्य मरो` - अंतुले

काँग्रेसचं `गरज सरो नी वैद्य मरो` - अंतुले

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 00:01

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळं बंडाचं निशाण फडकवलं आहे.

दहीहंडीत लहान मुलांच्या सहभागावर बंदी

दहीहंडीत लहान मुलांच्या सहभागावर बंदी

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 20:33

दहिहंडी उभारतांना चार ते चौदा वयोगटातील मुलांच्या सहभागावर बालहक्क आयोगानं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेचे बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला

मनसेचे बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 16:53

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला गेले आहेत. शेकापचे जयंत पाटीलही नांदगावकरांबरोबर आहेत. आता शेकाप्रमाणेच अंतुले मनसेला पाठिंबा देणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

किरीट सौमय्यांची शरद पवारांच्या विरोधात तक्रार

किरीट सौमय्यांची शरद पवारांच्या विरोधात तक्रार

Last Updated: Monday, March 24, 2014, 18:30

महाराष्ट्र पोलीस मुख्यालयामध्ये शरद पवार यांच्या विरोधात किरीट सौमय्या यांनी तक्रार दिली आहे. स्पेशल डीजी देवेन भारती यांची सोमयांनी भेट घेतली.

पवारांच्या वक्तव्यावर, उद्धव ठाकरेंची तोफ

पवारांच्या वक्तव्यावर, उद्धव ठाकरेंची तोफ

Last Updated: Monday, March 24, 2014, 16:38

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या दोनदा मतदान करा, या वक्तव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तोफ डागलीय.