कशामुळे होतेय पृथ्वी गरम?

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 17:14

समुद्रातील कार्बनपासून बनणाऱ्या मिथेनमुळेच पृथ्वीचं तापमान वढतंय असा एक गैरसमज होता. मात्र आता लागलेल्या एका नव्या शोधातून असं लक्षात आलंय, की पृथ्वीवरील गरम हवामानाला पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमणच जबाबदार आहे.

आजपासून एअरटेलची '४ जी' सेवा सुरू

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 12:07

भारती एअरटेलने देशात पहिल्यांदाच ४ जी सेवा सुरू केली आहे. भारतात अशी सेवा पहिल्यांदाच सुरू होत आहे. आजपासून ही सेवा कोलकात्यात सुरू होत आहे. या वायरलेस तंत्रज्ञानामुळे मोबाइलचा स्पीड सध्याच्या वेगाहून १० पटीने वाढणार आहे.

आकाशला झाकणार 'मायक्रोमॅक्स टॅबलेट'?

Last Updated: Sunday, April 8, 2012, 17:11

आकाश टॅबलेटने गॅझेट मार्केटमध्ये बरीच उलथापालथ केली होती. पण आता आकाश टॅबलेटला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स सज्ज झाली आहे. मायक्रोमॅक्स कंपनीनेही आता आपलं टॅबलेट मार्केटमध्ये आणलं आहे.

चंद्राचं गुरुत्वाकर्षण असमान

Last Updated: Friday, April 6, 2012, 15:53

चंद्राच्या विविध भागांत विविध गुरुत्वाकर्षण असल्याचा दावा काही खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. पृथ्वीच्या या एकुलत्या एक उपग्रहाच्या बदलत्या गुरुत्वाकर्षणाचं एक मानचित्रच काढल्याचा दावा या खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे.

'फेसबुक' आता मराठीमध्येही!

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 11:21

भारतीय फेसबुक युजर्सना आता आपल्या मातृभाषेत फेसबुक अ‍ॅक्सेस करण्याची संधी मिळणार आहे. कारण, मोबाइलमध्ये आठ भारतीय भाषांमध्ये फेसबुक अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा फेसबुक सुरू करणार आहे. येत्या काही आठवड्यांतच ही सुविधा मोबाइल्सवर सुरू होईल.

फनबुकची मजा लुटा अवघ्या ६४९९ रुपयात

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 17:34

अत्यंत स्पर्धात्मक किंमतीत मोबाईल फोनमध्ये अनेकविध फिचर्स उपलब्ध करुन देऊन अल्पावधीत बाजारपेठ काबिज करणाऱ्या मायक्रोमॅक्सने आता टॅबलेट पीसीच्या क्षेत्रात मुसंडी मारायचं ठरवलं आहे. मायक्रोमॅक्सने अवघ्या ६४९९ रुपयात फनबूक बाजारात आणली आहे.

मे महिन्यात, 'आकाश-२' हातात

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 14:06

आकाश टॅबलेटचं नवं व्हर्जन मे महिन्यात सादर करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी सोमवारी सांगितलं. आकाश टॅबलेट कोणताही व्यवसायिक फायदा न पाहाता विकण्यात येणार आहे.

मराठी विश्वकोश सहावा खंड ऑनलाइन

Last Updated: Saturday, March 31, 2012, 19:01

मराठी विश्वकोशाचा सहावा खंड आता वेबसाईटवर उलब्ध होणार आहे. मुंबईच्या ‘सिद्दीविनायक’ मंदिरात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आले.

भारतीय वेबसाइट्सवर चीनी हल्ले

Last Updated: Saturday, March 31, 2012, 18:47

चीनी हॅकर्सनी आता भारतीय सैन्य शोध संस्था आणि तिबेटी कार्यकर्त्यांवर आपला नेम साधला आहे. काँप्युटर सुरक्षेशी संबंधित एका संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार एका चीनी युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी हे सायबर हल्ले घडवत आहे.

धूमकेतूच्या कृपेने पृथ्वीवर जीवसृष्टीची धूम!

Last Updated: Thursday, March 29, 2012, 17:11

काही अब्ज वर्षांपूर्वी धूमकेतू वा हिमपिंडांनी पृथ्वीवर जीवोत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण केलं असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे. कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांच्या मते अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर धडकलेल्या धूमकेतूमुळे या ग्रहावर जीवोत्पत्तीसाठी आवश्यक असणारी तत्वं पसरवली