आयपॅड 3 पुढच्या महिन्यात बाजारात?

Last Updated: Friday, February 10, 2012, 16:08

ऍपल पुढच्या महिन्यात आयपॅड 3 बाजारात लँच करण्याची शक्यता आहे. नेक्स्ट जनरेशन आयपॅडमध्ये अधिक वेगवान चिप्स आणि चांगले ग्राफिक्स या फिचर्सचा समावेश असेल असं टेक्नोलॉजी न्युज साईट ऑलथिंग्जडीने म्हटलं आहे.

मुंबईतील कॉलेज घालणार ‘आकाश’ला गवसणी

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 13:56

जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट पीस असणाऱ्या ‘आकाश’ला मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आक्षेपार्ह मजकूर हटवला – फेसबूक-गुगलचा दावा

Last Updated: Monday, February 6, 2012, 16:19

आक्षेपार्ह ठरविलेला मजकूर आम्ही काढून टाकल्याचे फेसबुक-गुगलसह २१ वेबसाइटने कोर्टाला कळविले आहे. फेसबुक आणि गुगलसह इतर वेबसाइटला आक्षेपार्ह मजकुरासाठी कोर्टाने नोटीस पाठवली होती. त्याला या कंपन्यांनी उत्तर दिले आहे.

फेसबुक @ 8 नॉटआऊट

Last Updated: Monday, February 6, 2012, 00:01

लाखो दिल की धडकन बनलेला फेसबुकने अर्थातच fb ने आज म्हणता म्हणता आठ वर्ष पूर्ण केली आहेत. अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच या fb ने अक्षरश वेडावून सोडलं. जगभरात अल्पावधीतच प्रसिद्ध झालेली अशी एकमेव सोशल नेटवर्किंग वेबसाईट म्हणून fb ने अनेकांना सहजपणे भुरळ घातली.

मारुती सर्वोची नॅनोला टक्कर

Last Updated: Saturday, February 4, 2012, 15:28

भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकी सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी बाजारात आणणार आहे. ही चारचाकी आकाराने लहान असणार आहे. या गाडीची किंमतही एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत असणार आहे.

भारतात बनणार 'आकाश' टॅबलेट

Last Updated: Thursday, February 2, 2012, 16:42

स्वदेशी बनावटीचा आणी स्वस्त 'आकाश' टॅबलेट बनविण्यावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने भर दिला आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आपल्यासह तसेच अन्य विभागांशी संपर्क साधून संघटन तयार करण्याच्या कामाला लागलं आहे. यासाठी मंत्रालयाने नवीन उपकरण तयार केले आहे, अशी माहिती एका उच्च अधिकाऱ्यांने दिली. मात्र, आकाशच्या निर्मितीसाठी आयपॅड- 2 चे फीचर्स असलेल्या नवीन आकाशची ऑर्डर देण्याचे काम माहिती तंत्रज्ञान विभागच बघणार आहे. तर हे टॅब्लेट कोणत्या विद्यार्थ्यांना आणि कोणत्या महाविद्यालयांना द्यायचे याची यादी मात्र मनुष्यबळ विकास मंत्रालयच जारी करणार आहे.

मोबाइल बिल ठरवणार 'होम लोन'

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 23:45

आता जर तुम्हाला होमलोन हवं असेल तर तुमचं मोबाईल बिल वेळेत भरा. कारण ग्राहकाला गृहकर्ज देताना त्याच्या मोबाईल बिलाचा इतिहासही पडताळून पाहिला जाणार आहे. तशी माहितीच आपली कर्जाची पत ठरवणाऱ्या सिबिलने ठेवायला सुरुवात केली आहे. ही माहिती बँकांना पुरवण्यात येणार आहे.

'अल्ट्राबुक'ची नोटबुक, टॅबलेट पीसीला टक्कर

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 10:33

'अल्ट्राबुक'ची नोटबुक, टॅबलेट पीसीला टक्कर असणार आहे. अल्ट्राबुक' हे लॅपटॉप आणि टॅब पीसीचे कॉम्बिनेशन म्हणून ओळखले जात आहे. 'अल्ट्राबुक' हे अतिवेगवान आहे. 'विंडोज ७' वर चालणारा हा डिव्हाइस म्हणजे ०.८ इंच जाडी असलेला परिपूर्ण कॉम्प्युटर आहे.

जगातला पहिला चुंबकीय साबण

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 20:41

एका महत्त्वपूर्ण शोधातून शास्त्रज्ञांनी चुंबकीय साबण तयार केला आहे.या साबणात पाण्यात विरघळलेले लोहतत्व असणारे क्षार आहेत.

सरकारचे ऍप्लिकेशन स्टोअर लवकरच

Last Updated: Saturday, January 28, 2012, 13:31

मोबाईल फोनच्या माध्यमातून विविध सार्वजनिक सेवांचा लाभ घेता यावा यासाटी सरकार स्वत:चे ऍप्लिकेशन स्टोअरची निर्मिती करण्याचा विचार करत आहे