डिस्कव्हरची नवी स्पोर्टस् बाईक

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 10:22

नेहमीच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या दुनियेत नवनवीन मॉडेल्स् दाखल करणाऱ्या बजाज ऑटनं नुकतीच डिस्कव्हर १२५ स्पोर्ट्स टर्नर (एसटी) लॉन्च केलीय. जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यत ही बाईक प्रत्यक्षरित्या बाजारात दाखल होईल.

रेल्वे भरती : ६ मेपासून लेखी परीक्षा

Last Updated: Friday, May 4, 2012, 13:33

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेमध्ये ‘डी’ ग्रुप पदांसाठी ही भरती होणार आहे. त्याची लेखी परीक्षा ६ मेपासून सुरू होत आहे. दहा हजार जागांसाठी ही परीक्षा होत आहे.

बीपीओ कंपन्यांनी तरूणांची लावली वाट

Last Updated: Monday, April 30, 2012, 22:31

आयटी सेक्टरमधल्या बीपीओ कंपन्या कर्मचाऱ्यांचं शोषण करतात. नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ काम, अत्यंत कमी पगार देऊन कामगार कायद्याची सर्रास पायमल्ली केली जाते. याविरोधात शेकडो कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद सुरु केला आहे.

संमतीनेही सेक्स केला तरी तो बलात्कार

Last Updated: Friday, April 27, 2012, 09:24

संमतीनेही सेक्स केला तरी तो बलात्कार ठरणार आहे. हा नियम लागू होणार आहे, तो अठरा वर्षांखालील मुलींसाठी. कारण केद्र सरकारने तसे विधेयक पारीत केले आहे. अठरा वर्षांखालील मुलीशी तिच्या संमतीनेही लैंगिक संबंध ठेवले किंवा लैंगिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने लगट केली तर तो थेट बलात्काराचाच गुन्हा ठरणार आहे.

मोबाईल रिचार्ज करणे आता महाग

Last Updated: Friday, April 20, 2012, 10:36

मोबाईल धारकांनो आता आपल्या खिशाला थोडी कात्री लावावी लागणार आहे. कारण दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल रिचार्ज कुपनवर जादा कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फटका प्रीपेड मोबाईल ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे मोबाईल रिचार्ज करणे महाग होणार आहे.

'फेसबुक'मुळे १६ वर्षाची मुलगी आली धोक्यात..

Last Updated: Thursday, April 19, 2012, 06:46

फेसबुक वरून कोण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत असाल तर, जरा सावधान. कारण, फेसबुक वरील अशाच मैत्रीतून पुण्यातील एका मुलीचं अपहरण झालं. आणि तिच्या घरी खंडणी देखील मागण्यात आली.

तरूणांनो सावधान, पबवर पोलिसांचा डोळा

Last Updated: Friday, April 6, 2012, 21:36

तरूणांनो पब आणि रेस्टोबारमध्ये मस्ती करण्यासाठी जाल तर खबरदारी घ्यावी लागेल. कारण आता पब आणि बारवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. जुहू येथील भीषण अपघातानंतर जागे झालेल्या पोलिसांनी आता पब, रेस्टोबारबाहेर मद्यपरवान्याची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्लॅकबेरीची शरणागती, सर्व्हर मुंबईत

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 08:51

ब्लॅकबेरी फोनच्या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या मेसेजिंग सेवेत सरकारला कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास विरोध करणारी ब्लॅकबेरी (कंपनी-रिसर्च इन मोशन) अखेर दोन पावलं मागे आली. ब्लॅकबेरी कंपनीने मुंबईत आपला सर्व्हर लावल्याचे जाहीर केले आहे.

आर्टस् ग्रॅज्युएटसाठी रिक्रुटमेंट

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:25

प्रत्येक पालकांपुढं आणि विद्यार्थ्यांपुढं पदवीधर झाल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न सतावत असतो. त्यातच नोकरीचं शोधणही अवघड असतं. आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवणं जिकरीचं झालं आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना (आर्टस् ग्रॅज्युएट) खिजवलं जातं की, यांना कोण नोकरी देणारं? मित्रानो घाबरू नका. तुम्हालाही नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे आणि होणार आहे.

तरुणाईमध्ये 'व्हॅलेंटाईन्स डे'चा उत्साह

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 08:24

आज १४ फेब्रुवारी आहे. म्हणजेच आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हटलं की तरुणाईमध्ये जणू एक नवा उत्साह संचारतो. आपल्या प्रिय व्यक्तीला खास गिफ्ट देण्यासाठी एक वेगळीच लगबग सुरू असते.