आनंद साधणार हॅटट्रिक विजयाची?

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 10:36

वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये विश्वनाथन आनंद आणि इस्त्रायलच्या बोरिस गेलफंड यांच्यातील १२ वा गेमही बरोबरीत सुटला. त्यामुळे दोघांचेही प्रत्येकी ६ पॉईंट्स झाले आहेत. आता शेवटचा गेम बरोबीरत सुटल्यानं वर्ल्ड चॅम्पियनशिपचा निर्णय हा टायब्रेकरमध्ये होणार आहे.

टेनिसमध्ये युकी भांबरीचा पहिला नंबर

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 10:38

मागच्या आठवड्यात उजबेकिस्तानात झालेली चॅलेंजर टूर्नामेंट जिंकून युकी भांबरी भारतातला नंबर एकचा टेनिस खेळाडू बनलाय. युकीची ही आपल्या कार्यकालातील पहिलीच टूर्नामेंट होती. फायनलमध्ये इस्राईलच्या आमिर वेनट्राबचा ६-३, ६-३ असा पराभव करत भांबरीनं ७९व्या स्थानावर उडी मारलीय.

सुवर्णकन्यांना अजूनही बक्षिसाची रक्कम नाहीच

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 15:54

भारताच्या महिला टीमनं कबड्डीचा पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. त्या तीन खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.

'चेल्सी - चॅम्पियन ऑफ दी युरोप'

Last Updated: Monday, May 21, 2012, 11:16

107 वर्षांच्या इतिहासात ‘चेल्सी’नं पहिल्यांदाच युरोपियन चॅम्पियन्स लीग जिंकलीय. पेनल्टी शूट आऊटमध्ये बार्यन म्युनिकचा 4-3 असा पराभव करत चेल्सीनं विजेतपद पटकावलयं.

ऑलिम्पिक ज्योत पेटली रे....

Last Updated: Thursday, May 10, 2012, 16:05

लंडन ऑलिम्पिकचे वेध आता सर्वांना लागले आहेत. ऑलिम्पिकची तयारी म्हणुन ग्रीसमधील प्राचीन शहर ऑलिम्पिया येथे लंडन ऑलिम्पिक टॉर्चचं प्रज्वलन करण्यात आलं.

कुस्तीपटू नरसिंगला १५ लाखांची मदत

Last Updated: Thursday, May 10, 2012, 09:37

लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादवला अखेर महाराष्ट्र शासनानं १५ लाखांची मदत जाहीर केलीय. 'झी 24 तास'नं केलेल्या पाठपुराव्याची अखेर सरकारनं दखल घेत, मदतीचा हात पुढे केला आहे.

कुस्तीपटू नरसिंगचं ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 16:45

हेलसिंकी फिनलँड येथे लंडन ऑलिम्पिक क्वालिफाईंग टूर्नामेंटमध्ये भारताच्या नरसिंग यादवने ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होणारा नरसिंग हा भारताचा पाचवा कुस्तीपटू ठरला आहे.

भारतीय शूटर्सचा अपमान, हॉटेल बाहेर काढलं

Last Updated: Monday, April 30, 2012, 16:50

भारतीय शूटर्सचा लंडनमध्ये अपमान करण्यात आला. भारताचे शूटर्स लंडनमध्ये ऑलिंपिक टेस्ट इव्हेंटसाठी सहभागी झाले होते. मात्र या इव्हेंटनंतर भारतीय शूटर्सचा अनुभव अतिशय क्लेषदायक ठरला.

सानियाचा पाकिस्तानी जोडीदारास नकार

Last Updated: Thursday, April 26, 2012, 21:07

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने डबल्समध्ये पाकिस्तानी जोडीदाराबरोबर खेळण्यास साफ नकार दिलाय. इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानचा टेनिस स्टार ऐहसाम उल हक कुरैशी नव्हे तर भारताचा महेश भूपतिबरोबरच आपण डबल्समध्ये कोर्टवर उतरू, असं सानियाने स्पष्ट केलंय.