Last Updated: Friday, December 23, 2011, 17:54
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) सहा खेळाडूंवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. डोप चाचणीत दोषी ठरल्याने सहा खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या खेळाडूंना एक वर्षासाठी कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. मनदीप कौर, सिनी जोझ, मेरी टिएना थॉमस, प्रियांका पवार, जौना मुरमु आणि अकुंजी या डोप चाचणीत दोषी ठरल्या.