महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवला मारहाण

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 12:29

कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट नरसिंग यादवला नगरमध्ये मारहाण झाली आहे. नगरमध्ये वाडिया पार्क मैदानात अतुल पाटील आणि नरसिंगमधील लढत बरोबरीत सुटली. आणि दोघांना बक्षिसाची रक्कम अर्धी-अर्धी वाटून दिली.

भारतीय संघाचे लंडन ड्रीम साकार

Last Updated: Sunday, February 26, 2012, 22:35

भारतीय हॉकी संघाने फ्रान्सवर ८-१ असा शानदार विजय मिळवत लंडन ऑलिंपिकमध्ये प्रवेश केला आहे. संदीप सिंगने पाच गोल करत संघाच्या विजयाला मोलाचा हातभार लावला.

महिलांनी गमावलं, 'तुम्ही तरी करून दाखवा'

Last Updated: Saturday, February 25, 2012, 22:00

भारतीय पुरुषांनी हॉकी क्वालिफायर टुर्नामेंटच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारताचा मुकाबला फ्रान्सशी होणार आहे. लंडनं ऑलिंपिकमध्ये क्वालिफाय करण्यासाठी भारताला फायनल मॅच जिंकावीच लागणार आहे.

फायनलचे 'स्वप्न आमुचे भंगले'.........

Last Updated: Saturday, February 25, 2012, 21:45

भारतीय महिला हॉकी टीमने लंडन ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होण्याची संधी गमावली आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्वालिफाइंगच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकने भारतावर ३-१ ने विजय मिळवला. आणि भारतीय महिला हॉकी टीमचं ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न देखील भंगलं.

भारत ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या फायनलमध्ये

Last Updated: Friday, February 24, 2012, 22:06

भारतीय हॉकी संघाने शानदार कामगिरी करत आज ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या अत्यंत चुरशीच्या शेवटच्या साखळी सामन्यात पोलंडला ४-२ असे नमवले. आता भारताचा मुकाबला अंतीम सामना फ्रान्सशी होणार आहे. भारताने सलग ५ सामने जिंकून १४ गुण प्राप्त केले आहे.

हॉकी टीममध्ये आलीय नवी जान

Last Updated: Thursday, February 23, 2012, 16:24

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या ऑलिंपिक क्वालिफायरच्या फायनलमध्ये भारताचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. कॅनडाविरुद्धच्या रंगतदार लढतीमध्ये भारतानं ३-२ नं बाजी मारली. या विजयासाही भारतानं टुर्नामेंटमध्ये सलग चौथ्या विजयाची नोंद केली.

गौरवला मिळाली ११ हजारांची मदत

Last Updated: Thursday, February 23, 2012, 13:27

ल्गेरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या औरंगाबादमधील गौरव जोगदंड याला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अकरा हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राला कुणी 'मल्ल देता का मल्ल'?

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 12:04

कुस्तीमधली सर्वोच्च मानली जाणारी हिंदकेसरी स्पर्धा कोल्हापूरात होणार आहे. मात्र हिंदकेसरी कुस्तीसाठी महाराष्ट्रात तुल्यबळ मल्ल सापडत नाही. त्यामुळे हिंदकेसरीची गदा परराज्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय हॉकी टीमने साधली हॅटट्रिक

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 08:28

ऑलिम्पिकसाठी तयारी करताना भारतीय पुरूष हॉकी टीमने मंगळवारी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडीयम मध्ये चालू असणाऱ्या ऑलिम्पिक क्वालिफायर सामन्यात फ्रांसला ६-२ ने हरवून सलग तिसरा विजय नोंदवला आहे.

गौरवच्या पंखांना हवं आर्थिक बळ

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 20:09

औरंगाबादच्या एका रिक्षा चालकाच्या मुलाने असामान्य कामगिरी केली आहे. बल्गेरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी गौरवची निवड झाली आहे. मात्र गौरवला ही उत्तुंग भरारी घेण्यासाठी गरज आहे ती आर्थिक मदतीची.