लंडन ऑलिम्पिकच्या दरम्यान पाण्याचे दुर्भिक्ष्य?

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 15:39

लंडन ऑलिम्पिकच्या दरम्यान लंडन शहरात पाण्याच्या वापरावर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिक पार्क आणि स्पर्धा आयोजीत करण्यात आलेल्या लंडन आणि आसपासच्या परिसरात पाच एप्रिलपासून होसपाईपच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे

देशातल्या पहिल्या महिला मॅरेथॉनला उत्सफुर्त प्रतिसाद

Last Updated: Sunday, March 11, 2012, 14:15

मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सध्ये स्टे फ्री-DNA मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. देशातली ही पहिली महिला मॅरेथॉन स्पर्धा आहे.

(महिला दिन विशेष) भारतीय स्त्री खेळाडूंची घोडदौड

Last Updated: Thursday, March 8, 2012, 12:48

भारतीय क्रीडाविश्वात महिला मागे नाहीत. सायना आणि सानिया यांनीतर भारतीय क्रीडाक्षेत्रात आणि क्रीडा विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

सुवर्ण कन्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 18:22

भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या दोन महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

कबड्डीच्या मराठी सुवर्णकन्यांना १ कोटी

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 18:31

विश्वविजेत्या महिला कबड्डीपट्टूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे निर्णय आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

उपमुख्यमंत्र्यांनी केलं महिला कबड्डीपटूंचं अभिनंदन

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 08:37

सुवर्णा बारटक्के,अभिलाषा म्हात्रे, दीपिका जोसेफ या महाराष्ट्राच्या तीन वर्ल्ड कप विजेत्या कबड्डीपटूंनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी या तीघींचही यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं.

महाराष्ट्रातील कबड्डीपटूंना एक कोटी द्या - अजितदादा

Last Updated: Monday, March 5, 2012, 19:04

विश्वविजेत्या महिला कबड्डी संघातील महाराष्ट्रातल्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये बक्षीस देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. मराठी मातीतल्या कबड्डीसारख्या खेळाला प्रोत्साहन द्या अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

महिलांनी कबड्डी 'वर्ल्डकप जिंकून दाखवला'

Last Updated: Sunday, March 4, 2012, 20:15

भारतीय महिला कबड्डी टीमने पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये भारतीय महिला टीमने इराणला २५-१९ ने पराभूत करत वर्ल्ड कपच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

हॉकी खेळाडूंवर बक्षिसाचा वर्षाव

Last Updated: Thursday, March 1, 2012, 15:11

भारतीय हॉकी संघातील खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला सहारा इंडिया परिवाराने १ कोटी २७ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.