वेलिंग्टन कसोटी ड्रॉ, मालिकेत भारताचा पराभव

वेलिंग्टन कसोटी ड्रॉ, मालिकेत भारताचा पराभव

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 12:10

वेलिंग्टन कसोटी सामना ड्रा घोषित करण्यात आला आहे. कर्णधार मॅक्क्यूलम आणि कर्णधार धोनीच्या सहमतीने हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. यावरून न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आहे.

घायाळ टीम इंडियाला विराटच्या शतकी खेळीने दिलासा

घायाळ टीम इंडियाला विराटच्या शतकी खेळीने दिलासा

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 13:28

वेलिंग्टन कसोटीत विराट कोहलीन शानदार शतक झळकावलं आहे. विराट कोहलीने १२९ चेंडूत हे शतक झळकावलं आहे. मॅक्क्युलमच्या त्रिशतकी खेळीनंतर घायाळ झालेल्या टीम इंडियासाठी विराटची खेळी दिलासा देणारी आहे.

वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाची किंवीसमोर `कश्मकश`

वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाची किंवीसमोर `कश्मकश`

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 08:54

वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराला स्वस्तात बाद केलं आणि टीम इंडियाला खिंडीत गाठलंय.

मॅक्क्युलमने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास

मॅक्क्युलमने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 08:36

वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रॅडन मॅक्क्युलमने त्रिशतक केलं आहे. त्रिशतक करणारा मॅक्क्युलम हा न्यूझीलंडचा पहिला बॅटसमन आहे.

चौथ्या दिवशी किवींनी रडवलं, मॅकुलम त्रिशतकाकडे

चौथ्या दिवशी किवींनी रडवलं, मॅकुलम त्रिशतकाकडे

Last Updated: Monday, February 17, 2014, 19:10

वेलिंग्टन टेस्टमध्ये न्यूझीलंड टीमनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. किवींनी चौथ्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 571 रन्सपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडकडे आता 325 रन्सची आघाडी आहे.

टीम इंडिया अंडर १९ क्वार्टर फायनलमध्ये?

टीम इंडिया अंडर १९ क्वार्टर फायनलमध्ये?

Last Updated: Monday, February 17, 2014, 20:14

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या युवा टीमनं स्कॉटलंडचा 5 विकेट्सनी पराभव केला. अतिशय नाट्यमय झालेल्या या लढतीमध्ये भारतानं स्कॉटलंडलसा पराभाची चव चाखायला लावत आपला क्वार्टर फायनलचा प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.

मॅक्क्युलम आणि वाटलिंगची रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप

मॅक्क्युलम आणि वाटलिंगची रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप

Last Updated: Monday, February 17, 2014, 10:05

न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रँडन मॅक्क्युलम आणि विकेटकीपर बीजे वाटलिंग यांनी कसोटी सामन्यात भागीदारीचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

वेलिंगटन कसोटी : भारतीय बोलर्सना विकेटचा शोध

वेलिंगटन कसोटी : भारतीय बोलर्सना विकेटचा शोध

Last Updated: Monday, February 17, 2014, 08:36

कर्णधार बँडन मॅक्क्युलम आणि विकेट कीपर बीजे वाटलिंगने वेलिंगॉन कसोटीत, लंच ब्रेकपर्यंत भारताला एकही विकेट मिळू दिलेली नाही. वेलिंगटन कसोटीचा आज चौथा दिवस आहे.

वेलिंग्टन टेस्ट : किंवींची ६ रन्सची आघाडी

Last Updated: Sunday, February 16, 2014, 12:39

वेलिंग्टन टेस्टमध्ये विजयाच्या समीप जाऊनही टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी काही विजय साकारता आला नाही. तिस-या दिवसअखेर न्यूझीलंड पाच विकेट्स गमावत 252 रन्सवर खेळत असून किवींनी 6 रन्सची आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंड कसोटीत भारत मजबूत स्थितीत

Last Updated: Sunday, February 16, 2014, 08:00

न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यात भारत एका मजबूत स्थितीत येऊन पोहोचला आहे. न्यूझीलंडने पाचव्या दिवशी सहा विकेट गमावले आणि न्यूझीलंड अजूनही पहिल्या डावापेक्षा १५२ धावांनी पिछाडीवर आहे.