पाणी व्यवस्थापनातून वाचवलं केळीचं पीक

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:38

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अशाही परिस्थितीत काही शेतकरी पाण्याचं व्यवस्थापन चोख करतात आणि चांगलं उत्पादन घेतात. अशा शेतक-यांपैकीच जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर पाटील यांनी 25 एकरावरील कपाशी आणि केळीचं पीक वाचवण्याच यश मिळवलंय.

शेतकऱ्यांसाठी `स्मार्ट कार्ड`

Last Updated: Monday, September 3, 2012, 08:10

गोवा सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे इथल्या शेतकऱ्यांना सबसिडी आणि कर्ज वितरण करण्यास सोयीचं ठरणार आहे. तसेच सरकार दरबारी माराव्या लागणार चकराही आता कमी होणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत केलंय.

मृत्यूचं उड्डाण...

Last Updated: Thursday, August 30, 2012, 23:01

आकाशात घडला तो थरार! काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! हवेत झाली दोन हेलिकॉप्टर्सची टक्कर! काही मिनिटात जळून खाक झाले हेलिकॉप्टर| भारतीय वायुसेनेच्या इतिहासातील धक्कादायक घटना!

बीमोड दहशतवादाचा!

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 23:19

कसाबने केलेला हल्ला हा देशावरील हल्ला होता... कसाबचे कृत्य सहन करण्यासारखे नाही… म्हणून कसाबला फाशीची शिक्षाच देण्यात यावी’ अशा शब्दात पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमीर कसाब याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावला.

टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 13:23

बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

ऊस लागवडीचा अभिनव प्रयोग

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 11:17

पारंपरिक ऊस लागवडीच्या पद्धतीला फाटा देणारा एक अभिनव प्रयोग गोंदिया जिल्ह्यातील शेकऱ्यानं केलाय. या प्रयोगामुळे त्यांचं साधारण ७० ते ७५ टक्क्यांनी उसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

Bank अकाऊंटवर दरोडा..

Last Updated: Monday, August 27, 2012, 22:17

तुमच्या बँक खात्यातील रक्कम दहशतवादी कृत्यासाठी वापरल्यास काय होईल, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर तुम्ही निष्काळजीपणे आपलं एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर आताच सावध व्हा.

पासवर्ड श्रीमंतीचा- 25 ऑगस्ट 2012

Last Updated: Sunday, August 26, 2012, 00:03

शेअरबाजारातले ऑटो, FMCG म्हणजेच ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन क्षेत्र आणि हेल्थ केअर हे सेक्टर्स सरत्या आठवड्यात तेजीत होते. तर बॅका, कॅपिटल गुड्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, आयटी, मेटल, ऑईल एण्ड गॅस, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि टेक के या क्षेत्रात मंदीसदृष्य वातावरण होतं.

`जयप्रभा स्टुडिओ`ची अखेर विक्री

Last Updated: Saturday, August 25, 2012, 17:45

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकला गेलाय. मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचा असलेला हा स्टुडिओ 11 कोटी रुपयांना विकला गेलाय. कोल्हापूरसाठी मानबिंदू असलेल्या या स्टुडिओची विक्री झाल्याने कोल्हापूरकर मात्र नाराज झाले आहेत.

मुंबई किना-यांवर रडारची नजर

Last Updated: Saturday, August 25, 2012, 14:13

मुंबईच्या किना-यांवर आणि परिसरातील समुद्रावर आता तीन रडारांची नजर असणार आहे. तारापूरचे दीपगृह, अलिबागजवळील कान्होजी आंग्रे बेट आणि कोर्लई दीपगृह या ठिकाणी रडार उभारण्यात आलेत. यासंदर्भात रडार उभारणा-या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपंनीच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.