पुण्यात पाणी कपात, पण जलकेंद्रात नासाडी!

Last Updated: Thursday, April 5, 2012, 21:04

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..... पुणेकरांवर सध्या पाण्याचं संकट कोसळलंय. त्याचवेळी पुण्याच्याच जलकेंद्रांतून लाखो लीटर पाणी वाया जातंय. दिवसाला दोन ते अडीच लाख पुणेकरांना पुरेल इतकं पाणी निव्वळ वाया जातंय.

महागाईचे चटके, सांगा कसं जगायचं?

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 23:21

देशभरात महागाईचा वणवा हळूहळू पेट घेत असताना त्यात आता खाद्यतेलाच्या किमतीही वाढत चालल्यायत. खाद्यतेलाच्या भडकत जाणा-या किमती हे नवं सकंट मानल जातय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची वाढलेली मागणी, अपुरा पुरवठा आणि त्यातच रुपयाचं घसरतं जाणारं स्थान यामुळे खाद्यतेलाच्या किमती आणखीन भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कॅगचा अहवाल झी 24 तासकडे, बड्या माशांवर ठपका

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 23:25

कॅगचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलाय. या अहवालात अनेक मंत्र्यांचे बुरखे फाटले आहेत. मंत्र्यांनी जमीनी आणि फ्लॅट्स लाटल्याचं या अहवालातून उघ़ड झालंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला नऊ कोटींची जमीन नऊ लाखांना देण्यात आलीय.

पुणे पोलिसांचं गौडबंगाल, 'उचलेगिरी'

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 22:47

पुण्याल्य़ा वारजे माळवाडी पोलिसांनी सोमावारी पहाटे एक कारवाई केली..मात्र त्या कारवाईवर आता एकच चर्चा सुरु झालीय.. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एका संशयीत वाहनचोराला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून तीन वाहनं जप्त केली...पण त्या तीन वाहनांपैकी एक बाईक मात्र चोराने चोरलीच नव्हती..वाहन चोरीला गेलं नसताना पोलिसांनी ती इमारतीतल्या पार्किंगमधून उचलून नेली.....तसेच त्यांनी बाईक मालकाला त्याची साधी कल्पनाही दिली नाही...पण सीसीटीव्हीच्या नजरेतून पोलिसांचा तो कारनामा सूटू शकला नाही.

अघोरी स्पर्धेसाठी लहान मुलं झाली बैलं...

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 17:34

शर्यतीच्या नावाखाली निर्दयी 'खेळ', बैलांप्रमाणे धावली कोवळी मुलं, कोवळ्या जीवांचा अमानुष छळ . दिग्गजांच्या सांगलीत अघोरी स्पर्धा बैलगाडीच्या शर्यती प्रमाणे लहान मुलांना चक्क बैलगाडीला जुंपलं जातं. कोवळ्यामुलांच बालपण करपून जाईल याची कोणालाच भीती नसते.

'त्या' अघोरी शर्यतीची गंभीर दखल

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 11:41

सांगली जिल्ह्यातल्या बेडग गावात अल्पवयीन मुलांना बैलगाडीला जुंपल्याचं वृत्त झी २४ तासनं प्रसारित केल्यानंतर या प्रकरणाची पोलीस खात्यानं गंभीर दखल घेतली आहे.

'गुरू' अमेरिकेला, 'शिष्या'ला व्हिसाच नाही मिळाला

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 09:21

‘वा गुरू’ या गाजलेल्या नाटकाची टूर अमेरिकेला निघाली आहे. ९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत या नाटकाचा दौरा होणार आहे. मात्र या नाटकात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अद्वैत दादरकरला व्हिसाच मिळालेला नाही.

'वर्ल्डकप' विजय 'वर्षपूर्ती'.. इंडियाने काय गमावलं

Last Updated: Sunday, April 1, 2012, 23:58

टीम इंडियाने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर तब्बल २८ वर्षांनी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली होती.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे मुंबई धोक्यात

Last Updated: Saturday, March 31, 2012, 21:26

बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसण्याची शक्यता आयपीसीसीनं व्यक्त केलीय. मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणाबाबत प्रशासनाची दुटप्पी भूमिकाच याला कारणीभूत ठरली आहे.

मनसेची 'राज'नीती

Last Updated: Friday, March 30, 2012, 23:53

मनसेच्या इंजिनचं बळ आता काँग्रेस आघाडीला मिळणार असल्यामुळे ठाणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुक चुरशीची होणार आहे. मनसेच्या या खेळीमुळं काँग्रेस आघाडीने मरगळ झटकली आहे तर शिवसेना भाजप युतीची डोकेदुखी वाढली आहे.