रायगडात पाण्याचा दुष्काळ

Last Updated: Friday, April 13, 2012, 09:55

दुर्गम भागातील महादेवाचा मुरा या गावाची व्यथा तर कुणाच्याही -हदयाला पाझर फोडेल अशीच आहे...इथं लोकवस्ती आहे पण रस्ते नाहीत..रस्ते नाहीत त्यामुळे कोणत्या सुविधाच गावात पोहचल्या नाहीत. रामभरोसे जीवन जगणा-या इथल्या गावक-यांना जणू शासनानं वाळीतच टाकलंय. त्यात भरीस भर म्हणून की काय पाणीटंचाईचं अस्मानी संकट गावक-यांवर कोसळलयं. खरं तर ही समस्या आजची नाही..पिढ्यानं पिढ्या इथं पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. पण ना त्याची राजकारण्यांना तमा, ना शासकीय अधिका-यांना....जिथं यंत्रणेलाच पाझर फुटत नाही तिथे निसर्गच मदतीला धावून येतो आणि इथल्या दगडालाही पाझर फुटतो.

भूकंपाची टांगती तलवार....

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 23:14

भूकंप या एका शब्दातच सगळं काही दडलंय. निसर्गाचं हे एक अक्राळ विक्राळ असं रुप आहे. भूकंपापुढं धरतीही थरारल्या शिवाय राहात नाही. हेच रुप इंडोनेशियातील नागरिकांना बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पहायला मिळालंय.

महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना!!!

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 20:06

आज थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुलेंची १८५ वी जयंती. पुण्यातला फुलेवाडा आजही फुलेंच्या कार्याची साक्ष देतो. या वाड्याचा आढावा घेतानाच, महात्मा फुलेंनी उभारलेल्या समाज परिवर्तनाच्या चळवळीचा आवाका फारच मोठा होता.

रायगडवर शिवरायांच्या शौर्याचे नवे पुरावे

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 13:04

शिवरायांची शौर्यगाथा सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच शौर्याची साक्ष देणारे पुरावे पुरात्तत्त्व विभागाला रायगडावर सापडलेत. शिवरायांच्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि वेगवेगळ्या शस्त्रांचे अवशेष रायगडावरच्या साफसफाई दरम्यान हाती लागले आहेत.

'सुभाष घई' शो मॅनचा 'फ्लॉप शो'

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 17:08

व्हिसलिंग वूड्स फिल्म इन्स्टिट्युट जमीन प्रकरणी सुभाष घई यांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. सरकारनं दिलेली जमीन परत घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. तोच निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला.

चेक वटला नाही तर...

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 16:17

तुम्हाला मिळालेला चेक वटला नाही किंवा तुम्ही दुसऱ्याला दिलेला चेक बाऊन झाला तर तुमचे काही खरे नाही. चेकचे लफडे आता महागात पडणार आहे. बॅंक आता तुमच्या खात्यावरच कायमची काट मारण्याची शक्यता अधिक आहे. कारण चार ते पाच वेळा काही कारणांनी चेक वटला नाही तर खाते बंद करून तुमचे बॅंकेचे दरवाजे कायमचे बंद होतील. त्यामुळे तुम्ही अधिक सावधनता बाळगली पाहिजे.

रिडले कासव पिलांना जीवनदान

Last Updated: Saturday, April 7, 2012, 22:43

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्यातल्या वायंगणीच्या बीचवर ७७ रिडले कासवांच्या पिलांना जीवनदान देण्यात आले आहे. या पिलांना सुखरुप समुद्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडमधील वेळास सागरकिनारीही अशी मोहीम राबविण्यात येत आहे. याठिणी कासवांच्या पिलांसाठी घरे तयार केली जातात.

विदर्भातील राहुल रोहणे IFS

Last Updated: Saturday, April 7, 2012, 14:52

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुऱ्यातील राहुलनं रोहणे परिवारासह राजु-याचं नाव उंच केलयं. गरीब कुटूंबातील २४ वर्षीय राहुलनं कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय IFS चा गड सर केलाय. आपल्या कर्तृत्वानं त्यानं इच्छा तिथे मार्ग ही म्हण प्रत्यक्षात साकारली आहे.

दुष्काळाचं दुष्टचक्र !

Last Updated: Friday, April 6, 2012, 23:39

महाराष्ट्राच्या कुणा एका बळीराजाची व्यथा ही केवळ त्याचीच नाही तर महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा सोस सोसणा-या असंख्य बळीराजाची आहे. अवघ्या काही महिन्यापुर्वी आम्ही ग्रामीण महाराष्ट्राचे नेते, शेतक-याचे पुत्र आहोत असं सांगत जोरदार भाषणबाजी करणा-या सा-यानीच आज या बळीराजाला एकटं पाडलय.. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना दुष्काळांन होरपळणा-या या सर्वसामान्यांना अस्मानीच नाही तर सुल्तानी संकटाला सामोरं जावं लागतय.. ज्यांच्याकडून थेट दिलासा मिळण्याची अपेक्षा त्या कृषीमंत्र्यानी दिलासादायक अस काहीच न सांगता धक्कादायक विधान करत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यावरच दुष्काळाच खापर फोडलं..

शिक्षणाचा खेळखंडोबा आणि राजकीय आखाडा

Last Updated: Thursday, April 5, 2012, 23:03

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासन कारभारात एक पेपरफुटीचा प्रकार घडला आणि सा-याच कारभारावर आज राजकारणी बोट ठेवायला सुरुवात झालीय.. खरतर यानिमित्तानं सुरु असलेली कुलगुरु हटाव मोहीम जरा वेगातच झाली.. पण कुलगुरु हटाव मोहीमेला विद्यापीठाच्या बाहेरच्या राजकारणापेक्षा हा अंतर्गत राजकारणाचा खेळ जास्त आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुमारे साडेसहाशे महाविद्यालये येतात. आणि या विद्यापीठाअंतर्गत साडेसहा लाख विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असतात.. आज आरोप प्रत्यारोपापेक्षा विद्यापीठाला गरज आहे ती ख-या सक्षम प्रशासकीय धोरणाची.