त्रिवेदींची शेरोशायरी ठरली 'लक्ष्य'वेधी

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 14:58

दिनेश त्रिवेदी यांचं पहिलचं बजेट असल्याने ते स्वत: देखील जास्तच उत्सुक होते. आणि उत्सुकतेच्या भरात त्यांनी लोकसभा भाषणात शेरोशायरी देखील पेश केली. आणि त्यांच्या याच शेरोशायरीला लोकसभेतील सगळ्याच मंत्र्यांनी दाद दिली.

मुंबईसह महाराष्ट्राला काय देणार रेल्वे बजेट?

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 08:57

आज लोकसभेत रेल्वे बजेट सादर करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी हे आज बजेट सादर करतील. त्रिवेदी यांचं हे पहिलंच रेल्वे बजेट असणार आहे. नेहमीप्रमाणे या बजेटकडून मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार याकडं साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

स्त्री अर्भकाला फेकून देणाऱ्या वॉर्डबॉयला अटक

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 08:17

अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात स्त्री अर्भकाला फेकून दिल्याप्रकरणी एका वॉर्डबॉयला अटक केली आहे. या रुग्णालयाच्या परिसरात एका स्त्री अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याचे वृत्त झी २४ तासने चार दिवसांपूर्वी दाखवलं होतं.

बाबा फकीर, विश्वस्त आमीर...

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 23:40

गेल्या आठ वर्षापासून अस्तीत्वात असलेलं शिर्डीतील साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ 15 दिवसांत बरखास्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे..या निर्णयामुळे शिर्डीतील ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केलीय..कोर्टाचा हा निर्णय एकप्रकारे राज्य सरकारसाठी चपराकचं असल्याचं बोललं जात आहे.

मध्य रेल्वेला 'कोणी नव्या ट्रेन देतं का ट्रेन'?

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 18:46

उपनगरीय रेल्वेचा सर्वात जास्त विस्तार असलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा आहेत. लोकल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याची दरवर्षीची मागणी नेहमीच अपुरी राहते.

रेल्वे अपघातांना आळा बसणार का?

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 15:50

जीवघेण्या गर्दीमुळे लोकलमधून पडणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, लोकल प्रवास करतांना रेल्वे खांबाचा धक्का लागणे, लोकलमध्ये चढतांना प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्यांच्यामध्ये असलेल्या अंतराने अपघात होणे अशा विविध घटनांची गेल्या पाच वर्षातील धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.

नांदेडला सापत्न वागणूक

Last Updated: Monday, March 12, 2012, 22:10

मराठवाडा रेल्वे विभाग तसा कायम दुर्लक्षितच राहिलाय. नांदेड महाराष्ट्रात असला तरी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आलय. हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेडला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालीये.

वेस्टर्न रेल्वेला लोकल वाढणार का?

Last Updated: Monday, March 12, 2012, 21:48

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पूर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे.

विदर्भात रेल्वेतही अनुशेष

Last Updated: Monday, March 12, 2012, 21:10

गेल्या एक दशकापासून विदर्भातला अमरावती-नरखेड प्रकल्प अपूर्ण आहे. शिवाय अनेक नव्या रेल्वेमार्गाच्या मागण्याही प्रलंबित आहेत. त्यामुळे 14 मार्चला सादर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरकरांच्या या मागण्यांना विचारात घेऊन विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

'यशवंतराव चव्हाण' द्रष्ट्या नेत्याला 'मानवंदना'

Last Updated: Monday, March 12, 2012, 23:57

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कराड इथल्या त्यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.