Last Updated: Sunday, May 19, 2013, 19:43
www.24taas.com, झी मीडिया, कुडाळश्रीशांत आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं स्पष्ट केलय. श्रीशांतला कधीही भेटले नसल्याचं तिनं म्हटलंय. सध्या कोकणात कुडाळमध्ये चित्रिकरणात असल्याचंही क्रांतीनं सांगितलं.
एका नव्या वृत्तवाहिनीने माझं नाव या प्रकरणात अकारण दाखवल्याचं क्रांतीचं म्हणणं आहे. याबाबत संदर्भात ती संबंधित वृत्तवाहिनीविरोधात कोर्टात जाणार आहे. आपण सध्या कोकणातल्या कुडाळमध्ये सिनेमाचं शुटिंग करत असल्याचं क्रांतीने म्हटलं आहे. यासंबंधीचे अनेक फोटो आणि स्टेटस आपण वेळोवेळी फेसबुकवर अपलोड करत असल्याचा निर्वाळाही क्रांतीने केला आहे.
मात्र याबाबत श्रीशांतसोबत केवळ एका मराठी अभिनेत्रीचे नाव चर्चेत आलेले असताना, क्रांती रेडकरनं स्वतःहून खुलासा का केला, याचं गौडबंगाल मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, May 19, 2013, 19:43