२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत, मेट्रो-३ टप्याला मान्यता , Authorized to Slum 2000 of Mumbai, Metro

२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत, मेट्रो-३ टप्याला मान्यता

२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत, मेट्रो-३ टप्याला मान्यता
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं आपलं लकवा धोरण बाजूला ठेवत निर्णयांचा धडाका सुरु केलाय. बुधवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीत २००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच राज्यातल्या १३८ नवीन नगरपालिकांना मंजुरी देण्यात आलीय. तर मेट्रो-३ टप्याला मान्यता देण्यात आली आहे.

कुलाबा ते सिप्झ या मेट्रो-३ च्या टप्याला मान्यता देण्यात आली असून राज्यातल्या युनानी आणि आयुर्वेदेकी डॉक्टरांना ऐलोपथीची प्रॅक्टीस करण्यासही परवानगी देण्यात आलीय.

या विषयावर विधेयक आणयचे की अध्यादेश याबाबत विधी आणि न्याय खात्याकडून मतं मागवण्यात येणार आहे.तसंच मराठा आरक्षणाबाबतचा अहवालही नारायण राणे समितीनं मुख्यमंत्र्यांना सादर केलाय. मराठा समाजाला २० टक्के आरक्षण द्यावं अशी शिफारस यामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे.

निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता राज्यातल्या सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोणालाही उत्पन्नाची मर्यादा न ठेवता सर्वांसाठी मोफत औषधं उपलब्ध होणार आहेत.

तसंच संरक्षित झोपड्यांच्या १९९५ नंतरच्या हस्तांतरणाला सरकारनं परवानगी दिल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, February 27, 2014, 08:10


comments powered by Disqus