विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २० मार्चला निवडणूक, Maharashtra Assembly of the Member Retirement

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २० मार्चला निवडणूक

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २० मार्चला निवडणूक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र विधानसभेकडून विधान परिषदेवर निवडून गेलेले नऊ सदस्य नवृत्त होत असल्याने त्या जागा भरण्यासाठी येत्या २० मार्च रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली.

नीलम गोर्‍हे (शिवसेना), जयप्रकाश छाजेड, विनोद तावडे व पांडुरंग फुंडकर (भाजप), हेमंत टकले, किरण पावसकर, रणजितसिंग पाटील आणि संजय पाटील (राष्ट्रवादी) आणि शिवाजीराव देशमुख (काँग्रेस) हे विधान परिषदेचे विद्यमान सदस्य सहा वर्षांची मुदत संपवून येत्या २४ एप्रिलला निवृत्त होत आहेत.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ही निवडणूक होत आहे.

- निवडणुकीची अधिसूचना ३ मार्च २०१४ रोजी जारी केली जाईल.

- अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च, २०१४

- अर्जांची छाननी ११ मार्च २०१४

- उमेदारांनी आपला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १३ मार्च, २०१४

- मतदान दिनांक २० मार्च, २०१४

- मतदान सकाळी ९.०० वाजता सुरू होईल. दुपारी ४.०० वाजेपर्यंत होईल.

- मतमोजणी २० मार्च २०१४ ला दुपारी ५ वाजल्यानंतर.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 26, 2014, 08:28


comments powered by Disqus