`अॅट्रोसिटी`त डॉ. लहानेंना अटकपूर्व जामीन मंजूर, dr. tatyarao lahane gets bail before arrest

`अॅट्रोसिटी`त डॉ. लहानेंना अटकपूर्व जामीन मंजूर

`अॅट्रोसिटी`त डॉ. लहानेंना अटकपूर्व जामीन मंजूर

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

डॉक्टर तात्याराव लहाने यांनाना मुंबई सेशन्स न्यायालयानं १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. त्याचबरोबर तात्याराव लहाने यांना तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत.

डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यावर जे. जे. हॉस्पिटलमधील एका सफाई कर्मचाऱ्यानं अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर लहाने यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

पण, पहिल्या सुनावणीच्या वेळेस कोर्टानं त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत जे. जे. हॉस्पिटलमध्ये जाण्यास मनाई केली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीच्या वेळेस कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय.

त्यामुळे जे. जे. हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांना तपासण्यास आणि आपलं कामकाज पाहण्यासाठी डॉ. लहाने यांना हॉस्पीटलचे दरवाजे उघडलेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 27, 2014, 18:46


comments powered by Disqus