Last Updated: Wednesday, February 26, 2014, 23:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मराठा समाजाला आरक्षणाची बाब आता दृष्टीक्षेपात आली असून या संदर्भातील घोषणा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी येत्या २८ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाजाला १५ टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. आरक्षण देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या नारायण राणे समितीची अंतिम बैठक गुरुवारी रात्री उशीरा होत आहे. त्यानंतर नारायण राणे स्वतः हा अहवाल रात्री उशीराच मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचं समजतंय.
मराठ्य़ांना ओबीसीमध्ये आरक्षण देणार की वेगळं देणार? याबाबत उत्सुकता आहे. मागील अनेक वर्ष मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा रोष नको म्हणून सरकार त्याबाबत आता घाईघाईनं निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय. मात्र, घाईने घेतलेला निर्णय न्यायालयात टिकेल का? याबाबत संभ्रम आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 26, 2014, 23:25