Last Updated: Wednesday, February 12, 2014, 11:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चेंबूरमध्ये आरसीएफ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
राज ठाकरे आज सकाळी वाशीटोलनाक्यावर रास्तारोको आंदोलनासाठी निघाले होते. त्यांना सायन आणि चेंबूर दरम्यान अटक करण्यात आली.
राज ठाकरे हे शांततेच्या मार्गाने आंदोलनाला जात असतांनाही, त्यांना अटक करण्यात आली. याचा निषेध म्हणून शर्मिला ठाकरे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
आरसीएफ पोलिस ठाण्यासमोर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात शर्मिला ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी जमले आहेत.
शांतता झाल्यानंतर राज ठाकरे यांना सोडून देण्यात येईल, असं पोलिस सुत्रांनी म्हटलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 12, 2014, 11:35