हा़यवे जाम करा..पण आजचा दिवस जपून - राज ठाकरे, Highway get jammed .. Today`s the Day Protect - Raj

हा़यवे जाम करा..पण आजचा दिवस जपून - राज ठाकरे

हा़यवे जाम करा..पण आजचा दिवस जपून - राज ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उद्याच्या रास्तारोकोच्या पार्श्वभूमीवर राज यांना जमावबंदीची नोटीस जारी करण्यात आली असली तरी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना जपून राहण्याचा सल्ला दिलाय. पोलिसांच्या अटकेपासून सावध राहा, असे राज यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

टोलविरोधातल्या उद्याच्या आंदलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्य़क्ष राज ठाकरेंनी मनसे आमदार आणि पदाधिका-यांची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना तोडफोड न करण्याचे आदेश दिले. तसंच शांततेत मोर्चा काढून हाय-वे जाम करा. मात्र जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचंही कार्यकर्त्यांना बजावलंय. तसंच आज पोलिसांपासून अटक टाळण्यासाठी जपून राहण्याचा सल्लाही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलाय.

१२ फेब्रुवारी म्हणजे उद्या मनसे टोलविरोधात रास्तारोको करणार आहेत. या रास्तारोकोचं नेतृत्व स्वत: राज ठाकरे करणारेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या त्या-त्या भागातल्या पदाधिका-यांना भेटून रणनिती निश्चित करतायत. राज ठाकरे स्वत: यासंदर्भातली मनसेची भूमिका संध्याकाळी सहा वाजता स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनसेच्या टोलविरोधातल्या आंदोलनापूर्वीच सरकारनं तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. टोलचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं मनसेशी चर्चा करण्याची तयारी दर्शवलीय. टोलबाबत पारदर्शकता आणण्यासाठी मनसेचे टोलसंदर्भातले तज्ज्ञ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चर्चा करतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.

राज यांच्या कार्यकर्तांना सूचना

- कोणीही तोड़फोड़ करु नका
- शांततेने मोर्चे काढ़ा
- लोकांना त्रास होईल असं काही करु नका
- हा़यवे जाम करा
- आजचा दिवस सगळ्यांनी जपून राहा
- पोलीस अटकेपासून स्वत:चा बचाव करा

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 14:19


comments powered by Disqus