आंदोलन टोलनाक्यांवर, शहरांमधील वाहतूक सुरळीत mns toll agitation, no impact on city traffic

आंदोलन टोलनाक्यांवर, शहरांमधील वाहतूक सुरळीत

आंदोलन टोलनाक्यांवर, शहरांमधील वाहतूक सुरळीत

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मनसे टोल आंदोलनाचा शहर वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. हे आंदोलन टोल नाक्यांवर होणार आहे.

मुंबई शहरातही रिक्षा, टॅक्सी, बस वाहतूक सुरळीत सुरू आहे. पोलिसांचा बंदोबस्त मात्र मुंबई शहरात चोख दिसून येतोय.

बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने याचा परीक्षांवर काही परिणाम होईल का?, अशी भीती व्यक्त होत होती.

मात्र आंदोलन हे टोल नाका परिसरातच असल्याने शहरांमध्ये याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनीही कुणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने आंदोलन करण्याच्या सूचना केल्याने, शहरांमधील वाहतूक सुरळीत असल्याचं सांगण्यात येत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 12, 2014, 08:43


comments powered by Disqus