Last Updated: Wednesday, February 12, 2014, 11:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आली आहे. वाशीटोल नाक्यावर आंदोलन करण्यासाठी राज ठाकरे आज कृष्णकुंजवरून वाशीकडे रवाना होत होते. यावेळी त्यांना सायनजवळ पोलिसांनी अडवलं.
पोलिसांनी राज ठाकरे यांना पोलिस गाडीत बसण्याचं आवाहन केलं. यानंतर राज ठाकरे यांना अटक करण्यात आली. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे आमदार बाळानांदगांवकर तसेच, नितिश सरदेसाई, किल्लेदार यांनाही अटक करण्यात आली आहे.
सायनजवळ यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली, पोलिसांनी राज यांना गाडीत बसण्याचं आवाहन केल्यानंतर, राज यांनी शांतपणे अटक करून घेतली.
राज ठाकरे यांच्या अटकेनंतर आंदोलन अधिक चिघळणार किंवा नाही हे काही तासांत दिसून येणार आहे.
First Published: Wednesday, February 12, 2014, 10:46