Last Updated: Tuesday, February 11, 2014, 14:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोल नाक्यांच्या संदर्भात चर्चेची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरे यांनी पुकारलेल्या उद्याच्या टोल आंदोलनापासून सुटका मिळवण्यासाठी सरकारची धावाधाव सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांचं आंदोलन उद्या असलं तरी आतापासून वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. राज ठाकरे यांचं हे आंदोलन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला न परवडणारे आहे.
मनसेच्या टोलविरोधातल्या आंदोलनापूर्वीच सरकारनं तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. टोलचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं मनसेशी चर्चा करण्याची तयारी दर्शवलीय.
टोलबाबत पारदर्शकता आणण्यासाठी मनसेचे टोलसंदर्भातले तज्ज्ञ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चर्चा करतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 11, 2014, 14:36