Last Updated: Wednesday, February 12, 2014, 11:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमनसेचं टोल आंदोलन सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे.
मनसेच्या टोल आंदोलनावर छगन भुजबळ म्हणाले, कुणी कितीही आंदोलनं केली, तरी महाराष्ट्र टोल मुक्त होणार नाही. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे मनसेचं आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना चेंबूरमध्ये अटक करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना आरसीएफ पोलिस ठाण्यात आणण्यात आलं आहे.
राज ठाकरे यांच्यावरील ही कारवाई अत्यंत चुकीची आहे, असं सांगून शर्मिला ठाकरे यांनी पोलिस आरसीएफ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 12, 2014, 11:21