Last Updated: Wednesday, February 27, 2013, 21:39
www.24taas.com, औरंगाबाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थोड्या वेळापूर्वीच औरंगाबादमध्ये दाखल झाले. अहमदनगरहून निघाल्यावर त्यांनी थेट औरंगाबाद गाठलं. काल राज ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र त्या बैठकीनंतर राज यांनी थेट बोलणं टाळलचं, मात्र ते त्यांची भूमिका त्यांच्या जालन्यातील जाहीर सभेत माडंणार असल्याचेही सांगणार आहे.
राज ठाकरे औरंगाबादमध्ये पोहचताच त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यांच्या चाहत्यांची गर्दी औरंगाबादमध्ये फारच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली.. राज ठाकरे २ तारखेला जालन्यात जाहीर सभा घेणार आहेत.
त्यांच्या या सभेत ते कोणाकोणाला टार्गेट करणार आणि कोणाचा समाचार घेणार याकडेच आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर आज अजित पवारांनीही राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
First Published: Wednesday, February 27, 2013, 21:36