शरद पवारांच्या पोस्टरला काळे फासले, Sharad Pawar posters put up black in Khed

शरद पवारांच्या पोस्टरला काळे फासले

शरद पवारांच्या पोस्टरला काळे फासले
www.24taas.com,रत्नागिरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वाद-प्रतिवाद शिगेला पोहोचला असताना खेडमध्ये शरद पवार यांच्या पोस्टरला काळे फासले. त्यामुळे खेड शहरात तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांकडे बोट दाखविले आहे. पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी धक्काबुकी केल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे असून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


दरम्यान, नौटंकी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणलाय. जर कोणी असे समजत असेल तर उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, हेही लक्षात ठेवा, असा इशारा राज यांना पवार यांनी दिला.

पवार यांनी राज ठाकरे यांची नौटंकी सुरू असल्याचे म्हटले आहे. गडी बावचळाय. एकीकडे मराठीसाठी भांडायचे आणि दुसरीकडे गुजरातचा पुळका तर कधी बिहाचे कौतुक करायचे. नौटंकी करणाऱ्यांना कडक उत्तर देऊ, असा शाब्दीक इशारा यावेळी त्यांनी दिला. काम करणाऱ्यांनाच जनता निवडून देते, हेही लक्षात ठेवा, सल्ला राजना अजित पवारांनी दिला. त्यामुळे राज आता काय उत्तर देतात हे २ तारखेला होणाऱ्या सभेकडे लक्ष लागलेय.

First Published: Wednesday, February 27, 2013, 23:52


comments powered by Disqus