अमृता अरोरा
व्हिडिओ जॉकी म्हणून काम करणाऱ्या अमृतानं अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. दरम्यान, बिझनेसमन असलेल्या शकील लडक याच्यासोबत ती रिलेशनमध्ये होती. लग्नाआधीच तिला बाळाची चाहूल लागली आणि या जोडप्यानं कोणताही उशीर न करता विवाह बंधनात अडकून आपल्या संबंधांना समाजमान्यता दिली.
.
श्रीदेवी
श्रीदेवीही लग्नाआधीच गर्भवती राहिली होती... ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमाचा निर्माता बोनी कपूर आणि श्रीदेवी संबंधात होते. या दोघांनी 1996 मध्ये लग्न केलं आणि लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या मुलीचा – जान्हवीचा जन्म झाला.
.
सारिका
अभिनेत्री सारिका हिच्यावर सुपरस्टार कमल हसन याचं प्रेम जडलं होतं. त्यामुळे, पहिल्या पत्नीला – वानी गनपती हिला घटस्फोट देत कमल हसननं सारिकासोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांच्या पहिल्या मुलीचा म्हणजेच श्रुती हसन हिचा जन्म झाली. त्यानंतर या जोडप्यानं विवाह केला. लग्नानंतर त्यांच्या दुसऱ्या मुलीचा - अक्षराचा – जन्म झाला. यानंतर सारिकानं कमल हसनला घटस्फोट दिला.
.
सेलिना जेटली
सध्या, दोन जुळ्या मुलांची आई असलेली सेलिनाही लग्नाआधीच बाळाची चाहूल लागली होती. दुबईस्थित बिझनेसमन पीटर हग याच्यसोबत सेलिनानं एका सिक्रेट सेरेमनीमध्ये विवाह केला. यावेळी, सेलिनानं आपण गरोदर असल्याच्या बातम्यांना अफवा म्हटलं होतं. परंतु, लग्नाला नऊ महिने पूर्ण होण्याअगोदरच सेलिनानं दोन जुळ्या मुलांन जन्म दिला.
.
कोंकणा सेन शर्मा
बॉलीवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा ही 2007 साली अभिनेता रणवीर सुरीसोबत डेटींग करत होती. 2010 साली ही दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या 6 महिन्यानंतर त्यांचा मुलगा हारुन याचा जन्म झाला.
.
/marathi/slideshow/लग्नाआधीच-यांना-लागली-बाळाची-चाहूल_326.html/11