गुड न्यूज: होय जेनेलिया प्रेग्नेंट आहे- रितेश देशमुख

Last Updated: Sunday, June 8, 2014, 08:46

नुकतीच देशमुख कुटुंबात एक नव्या पाहुण्याचं आगमन झालंय आणि पुन्हा एकदा आणखी एका पाहुण्याच्या आगमनासाठी देशमुख कुटुंब सज्ज झालंय. होय विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख बाबा होणार आहेय रितेश आणि जेनेलियाच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. खुद्द रितेश देशमुखनेच त्याबाबतची माहिती दिली आहे.

बलात्काराचा गुन्हा; पालकमंत्र्याच्या भावाला अटक

Last Updated: Monday, February 17, 2014, 19:05

साताऱ्याचे पालकमंत्री शशीकांत शिंदे यांचे भाऊ ह्रषिकांत शिंदे यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

तुमच्यासाठी कोण महत्त्वाचं... मुलं की मोबाईल?

Last Updated: Thursday, December 26, 2013, 16:05

सगळ्या आई-वडिलांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त वेळ कशासाठी देता? याचं उत्तर एका स्वयंसेवी संस्थेनं सर्वेक्षणाच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला.

नाशिककरांनो, डोळ्यांत तेल घालून मुलांची काळजी घ्या!

Last Updated: Monday, December 2, 2013, 21:40

नाशिकमधल्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... शहरात गेल्या आठ दिवसांमध्ये पाच लहान मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झालाय. यामधल्या दोन मुलांनी प्रसंगावधान दाखवून आपली सुटका करुन घेतली...

दहीहंडीची जखमी गोविंदांना मिळाली सजा

Last Updated: Thursday, August 29, 2013, 14:41

दहीहंडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा थरथराट सुरू होईल. लाखालाखांच्या बक्षिसांच्या आमिषाने उंचच उंच हंड्या फोडण्यासाठी गोविंदा एका पायावर सज्ज होतील. पण दहीहंडीचा हा थ्रिलिंग जल्लोष काहींना आयुष्यभराची सजा देऊन जातो. अशीच एक करूण कहाणी.

पालकांनाच शिकवावं लागतंय शाळेत!

Last Updated: Monday, August 19, 2013, 22:47

वडाळा येथील डॉनबॉस्को शाळेत चक्क पालकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ आलीय. शिक्षक पालिकेच्या प्रशिक्षणाला जात असल्याची सबब देत शाळा पालकांनाच वर्गावर लावते.

शरीराला ताजेतवान करणारं खाद्य

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 09:49

आपण लवकर थकत असाल तर, झटपट एनर्जी देणारे खाद्य आहे. हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर माहित करून घ्या. शरीराला ताजेतवान ठेवणारं खाद्य म्हणजे कोबी, पेरु, पालक, आबंट चुका (अंबाडा) आणि गाजर यातून चांगली एनर्जी मिळते. त्यामुळे तुमचा थकवा पळून जातो आणि काम करण्याचा उत्साह तुम्हाला परत मिळतो.

गणेश नाईक यांना हायकोर्टाचा दणका

Last Updated: Saturday, July 6, 2013, 09:37

ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. बेलापूर एमआयडीसीमधले ग्लास हाऊस पाडून बावळेश्वर मंदिराची जागा ताब्यात घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

तरण तलावात गावगुंडांनी पालकांना केली मारहाण!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 19:58

नाशिक महापलिकेच्या सावरकर तरण तलावात गावगुंडांनी घुसून पालकांना बेदम मारहाण केली. खेळाडूंच्या स्पर्धेतून हा प्रकार उद्भवल्याचं बोललं जातंय.

डार्क चॉकलेट खा, आजार टाळा!

Last Updated: Thursday, May 9, 2013, 12:51

मुलं चॉकलेट खातात म्हणून बहुतेक पालक त्यांच्या मुलांना दटावतात पण, पालकांनो तुम्हीही असं करत असाल तर आजपासून मुलांना ओरडणं सोडून द्या आणि मुलांसोबत तुम्हीही निश्चिंतपणे चॉकलेट खा...

दृष्टी मिळाली पण भविष्यात मात्र अंधार...

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 09:30

मुंब्र्याच्या लकी कंपाऊंड दुर्घटनेत १८ तासानंतर बचावलेल्या संध्या ठाकूर या चिमुरडीला पुन्हा एकदा दृष्टी मिळालीय.

`बोर्डाच्या परीक्षेसाठी खाजगी शाळांचे वर्ग मिळणार नाही`

Last Updated: Thursday, February 14, 2013, 08:49

आत्तापर्यंत पालक आणि मुलांना कोंडीत पकडणाऱ्या खाजगी शाळांनी आता तर चक्क राज्य सरकारलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

सचिनसाठी `बालक-पालक`चं स्पेशल स्क्रिनिंग

Last Updated: Saturday, January 26, 2013, 12:20

रितेश देशमुख निर्मित ‘बालक-पालक’ सिनेमानं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सचिन तेंडूलकरही त्याला अपवाद ठरलेला नाही. नुकतंच, मुंबईमध्ये खास सचिनसाठी या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं.

सिनेमाच्या तिकिटासाठी हत्या!

Last Updated: Monday, January 14, 2013, 20:27

सिनेमाच्या तिकीट रांगेवरून झालेल्या वादात अजय खामकर या तरुणाची हत्या झालीय. मुंबईतल्या भारतमाता थिएटरबाहेर हा प्रकार घडलाय. हल्लेखोर अशोक चव्हाण याला पोलिसांनी अटक केलीय. बालक पालक हा सिनेमाच्या रांगोत उभं असताना त्यांच्यात वाद झाला होता

प्रणितीची प्रेरणा; बलात्कारीत मुलीचं स्वीकारलं पालकत्व

Last Updated: Friday, December 28, 2012, 19:43

बलात्कारीत मुलींकडे बघण्याच्या दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि त्या मुलीला स्वावलंबी बनवण्यासाठी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे पुढे आल्यात.

खबरदार... शाळा प्रवेशासाठी मुलाखती घेतल्या तर!

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 12:10

यापुढे राज्यभरातील कोणत्याही मराठी – इंग्रजी माध्यमांच्या शाळा मुलाखती घेत असल्याचं तुम्हाला आढळलं तर तुम्ही त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करू शकता. कारण...

मुलाला धमकीः नॉर्वेतल्या भारतीय पालकांना तुरुंगवास

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 17:05

वागणूक सुधारली नाही तर भारतात परत पाठवण्याची धमकी आपल्या मुलाला देणाऱ्या भारतीय दांपत्यास नॉर्वे येथील कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मुलाच्या वडिलांना १८ महिन्यांची तर आईला १५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 20:12

विमानांची तिकीट बुकिंग करणाऱ्या कंपनीकडून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक झाल्याचं प्रकरण पुण्यात उघड झालंय. चंडिगढमधल्या इंडो-कॅनेडीयन कंपनीन अशा हजारो पालकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय.

जेनेलिया मराठी सिनेमांच्या प्रेमात

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 14:09

‘बालक पालक’ या सिनेमाद्वारे रितेश देशमुख मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमामुळे मराठी सिनेमा आणखी एक पाऊल पुढे टाकेल, अशी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिला आशा आहे.

अजितदादांची जागा चालवणार सचिन अहिर

Last Updated: Sunday, October 21, 2012, 12:09

पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावावर शिकामोर्तब केले आहे. त्यामुळे अहिर हे आता पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

मुलांना 'तसल्या' साइट्सपासून ठेवा दूर

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:52

हल्ली आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेल्यावर एकटी मुलं घरी काय करत असतील, याची पालकांना नेहमीच चिंता असते. पण इंटरनेट आल्यापासून ही चिंता अधिक वाढली आहे. कारण, पालकांच्या परोक्ष मुलं इंटरनेटवर कुठल्या वेबसाइट्स पाहात असतील, अशी धास्ती हल्ली पालकांना वाटू लागली आहे.

स्कूल बसचा मंगळवारी संप

Last Updated: Sunday, December 18, 2011, 11:07

स्कूल बस ओनर्स असोसिएशननं मंगळवारी एकदिवसासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सायन मध्ये स्कूल बस चालकाच्या चुकीमुळं एका विद्यार्थ्य़ाचा मृत्यु झाला होता.

बार्शीत मतदानाला गर्दी

Last Updated: Sunday, December 11, 2011, 07:42

सोलापुरातल्या बार्शीत मतदानास सुरूवात झालीय. सुट्टीचा दिवस असल्यानं मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी गर्दी केलीय. बार्शीत अंदाचे पावणे दोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे.